AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या जवळ येऊ नको, मी दुसरं कोणाची…सुहागरातीला नव्या नवरीचं काडं, नवरा घाबरला

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका नव्या नवरीने सुहागरातीच्या दिवशी असं काही केलं की तिचा पती घाबरला. त्याने थेट बायकोच्या माहेरी फोन केला. नंतर जे घडलं सर्वजण चकीत झाले.

माझ्या जवळ येऊ नको, मी दुसरं कोणाची...सुहागरातीला नव्या नवरीचं काडं, नवरा घाबरला
suhagratImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 05, 2026 | 2:40 PM
Share

‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटासारखी एक खरी आणि अतिशय आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सुहागरातच्या रात्रीच नवविवाहितेने नवऱ्याला भयानक धमकी दिली. भयभीत झालेल्या नवऱ्याने आपल्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करून तीन दिवसांनंतर पत्नीला तिच्या प्रियकराच्या हवाले केले. हा संपूर्ण प्रकार आता परिसरात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.

२५ जूनला झाले लग्न

उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात येथी घटना घडली आहे. महिला पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या युवकाच्या वडिलांनी सांगितले की, मेरठ जिल्ह्यातील एका गावातील युवतीशी त्यांच्या मुलाचे २५ जून २०२६ रोजी पूर्ण रीतीरिवाजाने लग्न झाले. लग्नानंतर जेव्हा नवरा सुहागरातसाठी खोलीत गेला, तेव्हा नवविवाहितेने त्याला जवळ येण्यास स्पष्ट नकार दिला. तिने दोन टोकाचे शब्द उच्चारले, “मला स्पर्शही करू नका. मी दुसऱ्याची अमानत आहे आणि माझ्यावर फक्त माझ्या प्रेमकाचा हक्क आहे.”

कुटुंबासमोर प्रियकराशी फोनवर बोलणे

नवविवाहित इथेच थांबली नाही. तिने नवऱ्याला थेट धमकी दिली की, जर त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर ती त्याची हत्या करून टाकेल. त्यानंतर ती सतत पूर्ण कुटुंबासमोर फोनवर आपल्या प्रियकराशी बोलत राहिली.

कुटुंबाने पाठ फिरवल्यावर नवऱ्याने उचलले मोठे पाऊल

सुहागरातला हा भयावह अनुभव आणि नववधूचे वर्तन पाहून नवरा पूर्णपणे घाबरला. त्याने तातडीने संपूर्ण प्रकार फोनवरून मुलीच्या माहेरच्या लोकांना कळवला. पण मुलीच्या कुटुंबीयांनी फारशी गंभीरता दाखवली नाही आणि म्हणाले, “आमची मुलगी तुम्ही इथे सोडून जा.” युवकाच्या कुटुंबाने तिला एकटीने पाठवण्यास नकार दिला. शेवटी लग्नाच्या केवळ तीन दिवसांनंतर, म्हणजे २८ जून रोजी नवऱ्याने मोठे मन दाखवले. त्याने आपल्या पत्नीच्या प्रियकराला हापुडला बोलावले आणि पूर्ण आदराने पत्नीला तिच्या प्रियकाराच्या स्वाधीन केले.

भविष्यातील सुरक्षेसाठी पोलीस स्टेशन गाठले

मुलीला तिच्या प्रियकरासोबत पाठवल्यानंतर युवक आणि त्याचे कुटुंब कायदेशीर अडचणी आणि भविष्यातील कोणत्याही वाईट घटनेपासून बचाव करण्यासाठी सज्ज झाले. शुक्रवारी युवक आणि त्याचे वडील हापुडच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी पोलीसांना लेखी तक्रार दिली आणि संपूर्ण प्रकार खराखुरा सांगितला. पीडित पक्षाने पोलीसांकडे विनंती केली की, मुलगी आपल्या मर्जीने प्रियकरासोबत गेली असल्याने भविष्यात त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबावर कोणतीही संकट किंवा खोटी केस होऊ नये, याची दक्षता घ्यावी.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा