Neral Youth Drowned : नेरळमध्ये उल्हास नदीत तरुण गेला वाहून! तरुण वाहून जातानाचा व्हिडीओ आला समोर

गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटावरून रायगड जिल्ह्यात वाहत येणाऱ्या उल्हास नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे. या नदीत नेरळ परिसरात एक तरुण मासेमारी करण्यासाठी उतरला होता.

Neral Youth Drowned : नेरळमध्ये उल्हास नदीत तरुण गेला वाहून! तरुण वाहून जातानाचा व्हिडीओ आला समोर
बंधाऱ्यात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 8:19 PM

नेरळ : उल्हास नदीत एक तरुण (Youth) वाहून गेल्याची घटना नेरळमध्ये घडली आहे. हा तरुण मासेमारी करण्यासाठी उल्हास नदी (Ulhas River)त उतरला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरुण वाहून जातानाचा व्हिडीओ (Video) समोर आला आहे. तरुणाला वाचवण्यासाठी तिथे उपस्थित लोकांनी प्रयत्न केला. मात्र तरुण किनाऱ्यापासून लांब असल्याने त्याला वाचवता आलं नाही. ही सर्व घटना उपस्थित लोकांनी आपल्या मोबईलमध्ये कैद केली आहे. या तरुणाची ओळख अद्याप पटली नाही. तरुणाची शोधमोहिम सुरु आहे. तसेच तरुणाची ओळख पटवण्याचे कामही सुरु आहे.

मासेमारीसाठी नदीत गेला होता तरुण

गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटावरून रायगड जिल्ह्यात वाहत येणाऱ्या उल्हास नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे. या नदीत नेरळ परिसरात एक तरुण मासेमारी करण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्यानं हा तरुण वाहून जाऊ लागला. यावेळी या तरुणाला वाचवण्यासाठी तिथे असलेल्या काही जणांनी प्रयत्न केला. मात्र हा तरुण किनाऱ्यापासून लांब असल्यानं त्याला वाचवता आलं नाही आणि अखेर तो बदलापूरच्या दिशेनं वाहून गेला. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित करण्यात आलाय. तरुणाची शोधमोहिम सुरु आहे.

नंदुरबारमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पोहायला गेलेल्या 2 विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुक्त विद्यापीठाचा आज शेवटचा पेपर होता. तो पेपर दिल्यानंतर विद्यार्थी एकत्र पोहोण्यासाठी गेले होते. एकूण 8 मुले विरचक्क धरणात पोहायला गेली होती. सध्या धरणात पाणीसाठा कमी झाला असून मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे दोन विद्यार्थ्यांच्या गाळात पाय अडकून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. जिजामाता महाविद्यालय येथील मुक्त विद्यापीठात हे विद्यार्थी शिकत होते. राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. (A young man who had gone fishing in the Ulhas river was drowned in Neral)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.