AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतील तरुणीवर बंगळुरुत अत्याचार, विमा व्यवसाय मिळवून देण्याच्या बहाण्याने बेळगावमधील इसमाकडून फसवणूक

ख्वाजा चांद साहिब असे आरोपीचे नाव असून तो बेळगावचा रहिवासी आहे. आरोपीची आणि मुलीची टेलि कॉलिंगवरुन ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये गप्पा, चॅटिंग सुरु झाले. यावेळी तरुणीला विमा व्यवसाय मिळवून देण्याचेही आश्वासन दिले. या दरम्यान मैत्रीच्या नावाखाली त्याने लाखो रुपये त्याच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचाही आरोप आहे.

दिल्लीतील तरुणीवर बंगळुरुत अत्याचार, विमा व्यवसाय मिळवून देण्याच्या बहाण्याने बेळगावमधील इसमाकडून फसवणूक
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 5:36 PM
Share

दिल्ली : विमा व्यवसाय मिळवून देतो अशी बतावणी करीत एका 57 वर्षीय इसमाने कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीला भेटायला बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणी दिल्लीतील रहिवासी आहे. कॉल सेंटरमधून इन्शुरन्स संदर्भात टेली कॉलिंग दरम्यान पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. तरुणीच्या दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

ख्वाजा चांद साहिब असे आरोपीचे नाव असून तो बेळगावचा रहिवासी आहे. आरोपीची आणि मुलीची टेलि कॉलिंगवरुन ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये गप्पा, चॅटिंग सुरु झाले. यावेळी तरुणीला विमा व्यवसाय मिळवून देण्याचेही आश्वासन दिले. या दरम्यान मैत्रीच्या नावाखाली त्याने लाखो रुपये त्याच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचाही आरोप आहे. आरोपीच्या या खोट्या आश्वासनावर तरुणीचा विश्वास बसला. याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने तरुणीला बंगळुरुला भेटायला बोलावले.

नेमकं काय घडलं?

तरुणी आरोपीला बंगळुरुला भेटायला आली. आरोपीने एका हॉटेलमध्ये तिला भेटण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे तरुणी तिथे पोहोचल्यानंतर आरोपीने तिने कोल्ड ड्रिंक प्यायला दिले. कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा तरुणी शुद्धीवर आली तेव्हा तिला आपल्यासोबत दृष्कृत्य घडल्याचे लक्षात आले. तसेच तिला आरोपीचा खरा चेहराही कळला. या सर्व प्रकारानंतर तरुणी नैराश्येत गेली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तो दिल्लीतील महिपालपूरमध्येही आला आणि तरुणीवर भेटण्यासाठी दबाव टाकू लागला. मुलीने नकार दिल्यावर त्याने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. यानंतर तरुणीने अखेर हरिनगर पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती पोलिसांना सांगितली. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी ख्वाजा चांदवर गुन्हा दाखल केला आहे. हरिनगर पोलीस ठाण्याचे एक पथक बंगळुरुला गेले आहे. (A young woman from Delhi was raped in Bangalore under the pretext of getting an insurance business)

इतर बातम्या

धक्कादायकः अडीच दिवसाला बलात्कार, 6 दिवसाला खून, बीडचा क्राइम रेट घातकच!

५ लाख रुपये दया नाहीतर … , अल्पवयीन मुलीनं रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; घटनाक्रम ऐकून पोलीस चक्रावले

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.