Dombivali Crime : पोलिसांवर हल्ला केला, दगड फेकले, पण मुंबई पोलिसांचा नादच खुळा, अखेर पकडलेच !

मुंबई पोलिसांनी आणखी एक यशस्वी कामगिरी पार पडली आहे. पोलिसांच्याही नाकी अऊ आणणाऱ्या कुप्रसिद्ध इराणी वस्तीत घुसून पोलिसांनी कारवाई केली आहे.

Dombivali Crime : पोलिसांवर हल्ला केला, दगड फेकले, पण मुंबई पोलिसांचा नादच खुळा, अखेर पकडलेच !
कल्याणच्या इराणी वस्तीतून मुंबई पोलिसांकडून आरोपी अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 3:58 PM

कल्याण / 30 ऑगस्ट 2023 : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी मुंबई पोलीस कंबरडे मोडल्याशिवाय राहत नाही. कायमचं आपल्या कुशल कामगिरीमुळे चर्चेत असलेले मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारी जगतात आपली दहशत कायम ठेवली आहे. कल्याणमधील कुप्रसिद्ध इराणी वस्तीत शिरुन गुन्हेगाराच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलीस आल्याची माहिती मिळताच इराणी वस्तीतील जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांवर दगडफेकही केली. मात्र मुंबई पोलिसांनीही हार न मानता सर्व अडथळे पार करत अखेर आरोपीच्या मुसक्या आवळल्याच. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

काय घडलं नेमकं?

कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील कुप्रसिद्ध इराणी वस्ती ही पोलिसांवर हल्ले करण्यासाठी कायम चर्चेत असते. सराईत गुन्हेगारांचा अड्डा म्हणून या वस्तीची ओळख आहे. ही वस्ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईमुळे ही वस्ती चर्चेत आली आहे. मुंबईतील अंधेरी डी एन नगर पोलिसांचं एक पथक रविवारी दुपारी या वस्तीत एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी आले होते.

घटना सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. मात्र पोलीस आल्याची कुणकुण लागताच वस्तीतील लोकांनी आरोपीची सुटका करण्यासाठी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. मात्र मुंबई पोलिसांनीही या अडथळ्याला न जुमानता आरोपीला अटक केलीच. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. स्थानिक पोलिसांची मदत न घेता मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे पोलिसांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नसल्याने दगडफेक करणाऱ्या आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला नाही.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.