कोल्हापूर : लातूरच्या ट्रक चालकाला आजऱ्याजवळील जंगलक्षेत्रात चार तरुणांनी लुटल्या (Loot)ची घटना घडली आहे. मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास आजरा आंबोली रस्त्यावरील जंगल क्षेत्रात ही घटना घडली आहे. लुटल्यानंतर आरोपींनी चालकाला हात पाय बांधून जंगलात फेकले. त्यानंतर ट्रक (Truck) घेऊन फरार (Absconded) झाले. अशोक अर्जुन पवार असे लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे ट्रक चालकला मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपी आणि ट्रकचा शोध घेत आहेत. मात्र अशा घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.