AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola : अकोल्यात ट्रकच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू, अशोक वाटिका चौकातील घटना

शहरातल्याअशोक वाटिका चौकामध्ये एक भीषण अपघात झाला. भरधाव येणाऱ्या ट्रकचालकानं 75 वर्षीय दुचाकीस्वार वृध्दाला जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात दुचाकीस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.

Akola : अकोल्यात ट्रकच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू, अशोक वाटिका चौकातील घटना
अकोल्यात ट्रॅकच्या धडकेने वृद्धाचा जागीच मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 2:44 PM
Share

अकोला : शहरातल्या सिव्हिल लाइन पोलिस (Police) स्टेशन हद्दीतील अशोक वाटिका चौकामध्ये एक भीषण अपघात (Accident) झाला. भरधाव येणाऱ्या ट्रकचालकानं (Truck) 75 वर्षीय दुचाकीस्वार वृध्दाला जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात दुचाकीस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. या  प्रकरणी ट्रकचालकाला सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील जिल्हाधिकारी मार्गालगत असलेल्या नवरंग सोसायटीतील योगिता अपार्टमेंटमधील 75 वर्षीय रहिवासी हरिराम बजाज हे त्यांच्या MH – 30 AM – 7645 क्रमांकाच्या दुचाकीने नेहरू पार्क चौकाकडून अशोक वाटिकेकडे येत होते. यादरम्यान त्यांच्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या MH – 04 -EY – 3622 क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. शहरात भरधाव जाणाऱ्या वाहणांचा बंदोबद केला पाहिजे, अशी मागणी या अपघातानंतर होते आहे.

शहरात अपघात वाढले

अकोला शहरात अपघात वाढल्याचं चित्र आहे. भरधाव जाणाऱ्या वाहन चालाकंना लगाम लावण्याची गरज आहे. अशा प्रकारे वाहने चालवल्यास रस्त्यावरुन चालणाऱ्यांच्या जीवाला देखील धोका उद्भवू शकतो. अशा प्रकारच्या सुसाट चालणाऱ्या मोठ्या वाहनांचे नियमन करणं गरजेचं आहे. त्यांच्यावर कडक निर्बंध लावल्यास अशा प्रकारचे अपघात टाळले जातील. वाहतुकीचे नियमन केल्यास शहरातील प्रत्येक भागात त्याचा फायदा होऊ शकेल. सुसाट वाहनांमुळे पादचाऱ्यांनाही त्रास होतो. सुसाट वाहन चालवणाऱ्यांवर वचक राहिल्याचं दिसंत नाही. शहरातील वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवं. अशा सुसाट वाहनांच्या भरधाव चालवण्याने विनाकारण त्याचा शहरातील रहिवाशांना त्रास होतो आहे. आता यावर  प्रशासन काय उपाययोजना करणार, वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जागीच मृत्यू

शहरातील जिल्हाधिकारी मार्गालगत असलेल्या नवरंग सोसायटीतील योगिता अपार्टमेंटमधील 75 वर्षीय रहिवासी हरिराम बजाज हे त्यांच्या MH – 30 AM – 7645 क्रमांकाच्या दुचाकीने नेहरू पार्क चौकाकडून अशोक वाटिकेकडे येत होते. यादरम्यान त्यांच्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या MH – 04 -EY – 3622 क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या सुसाट आणि भरधाव वाहनांचा थेट नागरिकांना त्रास होणार आहे.

वाहतूक पोलिसांना लक्ष देण्याची मागणी

अशा प्रकारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांना लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. सुसाट वाहनांमुळे पादचाऱ्यांनाही त्रास होतो. त्यांच्यावर वचक राहिल्याचं दिसत नाही. शहरातील वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवं. आता यावर  प्रशासन काय उपाययोजना करणार, वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात रहा…iPhone 14 ला ‘अशी’ मिळेल कनेक्टिव्हिटी

Ranbir Alia Wedding Gifts: करीनाकडून डायमंड नेकलेस तर नीतू कपूर यांच्याकडून 6BHK फ्लॅट; रणबीर-आलियाला मिळाले ‘हे’ महागडे गिफ्ट्स

Health Care : या जीवनसत्वाची कमतरता आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा हे जीवनसत्व नेमके कोणते?

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.