एक ताबीज गळ्यात तर दुसरा बांधला कमरेला; सासूच्या वशीकरणामुळे जावाई प्रेमात आंधळा; अलिगड लव्हस्टोरीचा नवीन टिस्ट काय
Aligarh Saas Damad Love Story : या प्रेमस्टोरीत अजून एक ट्विस्ट आला आहे. यामध्ये वशीकरणाचा एक मुद्दा समोर आला आहे. अर्थात त्यावर कुणाचा विश्वास नाही. पण हा नवीन घटनाक्रम समोर आला आहे. सासू-जावायाच्या या प्रेमस्टोरीने आतापर्यंत अनेक अँगल समोर आले आहेत. त्यात या नवीनची भर पडली आहे.

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे सासू आणि जावायाच्या प्रेमकांडमुळे देश हादरला आहे. या प्रेमकांडची चर्चा सगळीकडे सुरू आहे. मुलीचे लग्न अवघ्या 8 दिवसावर असताना ही सासू होणाऱ्या जावायासोबत रफूचक्कर झाली. अनिता देवी आणि राहुल कुमार हे दोघे नेपाळला पळून जात होते. पण मग ते पोलीस ठाण्यात हजर झाले होते. जाताना तिने लग्नसाठी ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने पण पळवल्याचा आरोप घरातील मंडळी करत आहे. जावाई आजारी पडल्यावर सासू पाच दिवस त्याच्या घरी थांबली. तिने जावायाला दोन ताबीज बांधायला दिले. त्यातील एक गळ्यात तर दुसरा कंबरेला बांधायला सांगितला. तेव्हापासून पोरगा तिच्या इशाऱ्यावर नाचायला लागला असा आरोप राहुलच्या वडिलांनी केला आहे. वशीकरण करुन सासूने मुलाला पळवल्याचा त्यांचा आरोप आहे.
मुलाला घरात घेणार नाही
अनिता देवी राहुल आजारी असल्याने पाच दिवस त्याच्या घरी थांबल्या. या आजारपणात तिने त्याची देखभाल केली. त्यानंतर तिने दोन ताबीज आणले. एक त्याच्या गळ्यात तर दुसरा कमरेला बांधायला सांगितला. आता तिने त्याला पळवून नेल्यानंतर आमच्या मनात या ताबीजविषयी शंका आल्याचे राहुलचे वडील म्हणाले. या महिलेनेच फसवणूक मुलाला पळवल्याचा आरोप त्यांनी केला. मुलाने समाजात आमचे नाव बदनाम केले. त्याला आता घरात घेणार नाही असे ते म्हणाले. त्याला संपत्तीमधून पण बेदखल करणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. मुलाने घर सोडताना घरातून पैसे आणि दागिने पळवल्याचा आरोप त्यांनी केला.




राहुलचा मेहुणा सुद्धा पोलिसांच्या रडारवर
मडराक पोलीस आता राहुलचे मेहुणा आणि त्याच्या कुटुंबियांची चौकशी करणार आहे. कारण हा मेहुणा सुद्धा राहुलच्या होणाऱ्या सासूच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचा या दोघांना पळवण्यात काही संबंध आहे का? त्याने दोघांना मदत केली का? याचा पोलीस तपास करणार आहे. DSP महेश कुमार यांनी सांगितले की तपास होत आला आहे, पण अजून काही ठोस हाती लागलेले नाही.
काय आहे प्रकरण
अलिगढ जिल्ह्यातील मडराक जवळील एका गावातील तरुणीचे लग्न दादो या गावातील राहुल कुमार याच्यासोबत ठरले होते. 16 एप्रिल रोजी लग्न होणार होते. पण त्यापूर्वीच राहुल आणि त्याची सासू अनिता दोघे फरार झाले. सासूने जावायाला एक फोन सुद्धा घेऊन दिला होता. सासू ही 20 वर्षाच्या जावायावर भाळली. दोघे पळून गेले. पण पुढे नेपाळ सीमावर्ती भागात ते पोलिसांना शरण आले. समजावून सांगितल्यावर सुद्धा सासूने जावायासोबत राहण्याचा निर्णय घेतला. या सासूचा 7 वर्षांचा मुलगा खूप रडला, पण तिचे हृदय द्रवले नाही.