AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जावई सासूशी लग्न करून पोहोचला गावात, मुलाच्या पत्नीला पाहून वडील म्हणाले ‘आता तू…’

Aligarh Saas damad News: सध्या सासू आणि जावयाची प्रेम कहाणी चर्चेत आहे. दोघांनीही पळून जाऊन लग्न केले आहे. आता जावई पत्नीला घेऊन घरी पोहोचला आहे. गावकऱ्यांनी त्यांचे ज्या प्रकारे स्वागत केल ऐकून बसेल धक्का

जावई सासूशी लग्न करून पोहोचला गावात, मुलाच्या पत्नीला पाहून वडील म्हणाले 'आता तू...'
AligadhImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 20, 2025 | 1:08 PM
Share

सध्या उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये फक्त एकाच प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. ती जावई आणि सासूची प्रेमकथा आहे. एका कलियुगातील आईचा तिच्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यावर जीव आला. ती तिच्या जावयासोबतच घरातून पळून गेली. १० दिवसांनी पोलिसांनी त्यांना पकडले आणि चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. शेवटी, पोलिसांनी सासू आणि जावई दोघांना सोडले. आता जेव्हा राहुल त्याच्या नवीन वधूसोबत, म्हणजेच सासूसोबत घरी पोहोचला, तेव्हा गावकऱ्यांनी भयानक पद्धतीने स्वागत केले.

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण अलीगढच्या मद्रक पोलिस ठाण्याचे आहे. येथील एका गावात राहणारा जितेंद्र कुमार बंगळुरूमध्ये काम करतो. काही महिन्यांपूर्वी त्याने त्याची मुलगी शिवानीचे लग्न राहुलशी ठरवले होते. मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी ५ लाख रुपयांचे दागिने तयार केले होते आणि ३ लाख ५० हजार रुपयांची व्यवस्थाही केली होती. पण राहुल त्याच्या सासू अनिता उर्फ ​​सपना उर्फ ​​अपना देवी हिच्या प्रेमात पडला होता. अशा परिस्थितीत दोघांनीही एक योजना आखली आणि पळून गेले. पळून जाण्यापूर्वी, महिलेने तिच्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेले दागिने आणि तिने वाचवलेले पैसेही चोरले. कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी दोघांनाही अटक केली तेव्हा सासूने सांगितले की जितेंद्र तिला मारहाण करायचा. यासोबतच त्यांच्या लग्नाच्या बातम्याही समोर आल्या. आता पोलिसांनी दोघांनाही सोडले आहे.

वाचा: लग्नाच्या आधी नवरीची डेंजर अट, मैत्रिणींना आधी बसला धक्का नंतर लाजून…

गावकऱ्यांनी केले स्वागत

सासूसोबत पळून गेलेला जावई राहुलची कहाणी संपत नाहीये. शनिवारी पोलिसांकडून सुटका होताच, राहुल त्याच्या पत्नीसोबत घरी पोहोचला. पण राहुलचे वडील आणि गावकरी आधीच तिथे तयार उभे होते. अपना देवी आणि राहुल गाडीतून उतरताच गावकऱ्यांनी त्यांना हाकलून लावले. हातात विटा आणि झाडू घेऊन उभे असलेल्या गावकऱ्यांनी नववधूला शिव्या देऊन त्यांचे स्वागत केले. त्याच वेळी, वडिलांनी दोघांनाही गाडीतून गावाच्या मातीवर पाय ठेवण्यास मनाई केली. त्यांनी सांगितले की, दोघांनीही केवळ त्यांच्या कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण गावाची इज्जत घालवली आहे.

वडिलांनी धमकी दिली

राहुलचे वडील ओमवीर म्हणाले की, त्यांचे मुलगा आणि पत्नीशी कोणतेही संबंध नाहीत. तसेच त्यांना राहुलचा चेहराही पहायचा नाही. ओमवीरने त्यांचा मुलगा राहुलला धमकी दिली आणि पुन्हा या गावात येऊ नको. दुसरीकडे, पोलिस स्टेशन आणि समुपदेशन केंद्रात, राहुल आणि अपना देवी यांना पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. अपना देवीच्या धाकट्या मुलानेही तिला मिठी मारली आणि घरी परतण्याची विनंती केली. तरीही, देवीने हार मानली नाही आणि स्पष्टपणे म्हणाली की ती आता राहणार असेल तर फक्त राहुलसोबतच. राहुलनेही आपल्या पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सांगितले की त्याने लग्न केले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.