AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानी स्फोट प्रकरणात नंबर प्लेटचा खेळ; वाझेंकडून संभ्रम की स्वत:च गोत्यात?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. (Ambani Bomb Scare Case: sachin vaze played number plate game)

अंबानी स्फोट प्रकरणात नंबर प्लेटचा खेळ; वाझेंकडून संभ्रम की स्वत:च गोत्यात?
सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे
| Updated on: Mar 14, 2021 | 1:47 PM
Share

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील स्कॉर्पिओच्या नंबर प्लेटचं गूढ वाढलं आहे. या नंबर प्लेटच्या खेळातून वाझे तपास यंत्रणांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत की ते स्वत: गोत्यात येत आहेत, या बाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Ambani Bomb Scare Case: sachin vaze played number plate game)

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 24 फेब्रुवारी रोजी रात्री स्फोटकांनी भरलेली जी स्कॉर्पिओ कार मिळाली. त्याच कारमधून पत्रकार अर्णव गोस्वामींना अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं, अशी माहिती पुढे आली आहे. धक्कादायकबाब म्हणजे त्यावेळीही बनावट नंबर प्लेटचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी या स्कॉर्पिओला मोटारसायकलची नंबर प्लेट लावण्यात आली होती, असा दावा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

कार सापडल्यानंतरही नंबर प्लेटचा घोळ कायम

24-25 फेब्रुवारीच्या रात्री 1 वाजता स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या घराबाहेर ठेवण्यात आली होती. त्या गाडीत अनेक नंबर प्लेट्स सापडले होते. तसेच स्कॉर्पिओलाही बनावट नंबर प्लेट लावण्यात आले होते. त्याचवेळी कारमध्ये एवढे नंबर प्लेट का ठेवण्यात आले? असा सवाल निर्माण झाला होता.

त्या कारचा नंबर प्लेटही बनावट

याच दरम्यान सचिव वाझे यांना क्राईम ब्रँचमधून हटवण्यात आलं होतं. तेव्हा आपला कोणी तरी पाठलाग करतंय असा दावा वाझेंनी केला होता. पाठलाग करणाऱ्या गाडीचा नंबर प्लेट बनावट होता, असं त्यांनी म्हटलं होतं. खाली आणि वर जे गाडीचे नंबर आहेत ते वेगवेगळे आहेत. पाठी आणि समोरच्या नंबर प्लेटवरील नंबरही वेगळे असल्याचं वाझे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार व्यतिरिक्त इतर कारही आल्याची माहिती समोर आली. ही इनोव्हा कार एनआयएने पहाटे 3.45 वाजता ताब्यात घेतली आहे. या कारमध्येही बनावट नंबर प्लेटचा वापर झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एक तर वाझेंकडून नंबर प्लेटचा खेळ केला जातोय किंवा या नंबर प्लेटच्या खेळात स्वत: वाझे अडकले आहेत, असं सांगण्यात येतं. (Ambani Bomb Scare Case: sachin vaze played number plate game)

संबंधित बातम्या:

Prasad Lad | सचिन वाझेंची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : प्रसाद लाड

 ‘या प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल,’ कंगनाचं मोठं वक्तव्य

Sachin Vaze Arrested Updates : वाझेंच्या नेतृत्वातील पथकाचा भाग असलेले पोलीस NIA कार्यालयात दाखल

(Ambani Bomb Scare Case: sachin vaze played number plate game)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.