AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पब्जी गेमच्या माध्यमातून ओळख, मग भेटायला बोलावून पळवून नेण्याचा प्रयत्न, पण…

सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेममुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना सध्या उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पब्जी गेमच्या माध्यमातून ओळख, मग भेटायला बोलावून पळवून नेण्याचा प्रयत्न, पण...
नगरमध्ये तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्नImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 17, 2023 | 12:45 PM
Share

अहमदनगर : सोशल मीडियावरील ओळख एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावरील मित्राने भेटायला बोलावून तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना संगमनेर शहरात घडली आहे. तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून बिहारमधील दोघांना अटक केली. सोशल मिडियातून तरुणीची आरोपींशी ओळख झाली होती. आज दुपारी आरोपींना न्यायालयात हजर करणार आहेत. अकरम शेख आणि नेमतुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. लव्ह जिहाद आणि धर्मांतरचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप केला आहे.

पब्जी गेमच्या माध्यमातून ओळख

पीडित मुलीची 2 वर्षांपूर्वी पब्जी गेमच्या माध्यमातून आरोपींशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी आणि तरुणी सातत्याने सोशळ मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन वर्षानंतर काल 16 जून रोजी त्यांचे भेटायचे ठरले. त्यानुसार दोघे आरोपी बिहारमधून संगमनेरला तरुणीला भेटण्यासाठी आले. आरोपीने तरुणीला मालपाणी रिसॉर्ट येथे भेटायला बोलावले.

भेटायला बोलावले अन् पळवून नेण्याचा प्रयत्न

तरुणी रिसॉर्टवर भेटायला गेल्यानंतर आरोपी अकरमने तिच्याकडे एकांतात बसून बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते दोघे कासार दुमला रोडकडे घेऊन गेला. यावेळी अकरमने तरुणीला लग्नासाठी प्रपोज केले, मात्र तरुणीने त्यास साफ नकार दिला. यानंतर अकरमने तिला बळजबरीने ओढत नेऊ लागला. तसेच त्याचा मित्र नेमतुल्ला याने घरी येऊन तुझे आणि अकरमचे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्याची तिला धमकी दिली.

जागरुक नागरिकांमुळे तरुणीची सुटका

यावेळी तरुणीने आरडाओरडा सुरु केला. तरुणीचा आरडाओरडा ऐकून तेथे तीन ते चार इसम धावून आले. त्यांनी तरुणीकडे विचारणा केली असता तिने सदर दोघे जण आपल्याला पळवून नेत असल्याचे सांगितले. यानंतर त्या इसमांनी तरुणीची सुटका करत आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर संगमनेश शहर पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवत पुढील कारवाई सुरु केली.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.