Badlapur : बदलापूरच्या बॅरेज धरणात दोन तरुण बुडाले , तब्बल 24 तासांनी सापडले दोघांचे मृतदेह

मागच्या महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे बदलापूर आणि परिसरात देखील चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात अधिक पाण्याचासाठा आहे. रविवारी सायंकाळी पोहोयला गेलेल्या तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला आहे.

Badlapur : बदलापूरच्या बॅरेज धरणात दोन तरुण बुडाले , तब्बल 24 तासांनी सापडले दोघांचे मृतदेह
प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 1:19 PM

बदलापूर : बदलापूरच्या (Badlapur)  बॅरेज धरणात (Barej Dam)  बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तब्बल 24 तासांनी या दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. आठ तरुण सायंकाळच्या सुमारास धरणात पोहण्याठी उतरले होते. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन तरुण बुडाल्याची माहिती मिळताचं अग्नीशमक दल आणि पोलिस पथक (Police Team) तिथं दाखल झालं. रात्री अंधार झाल्याने आणि तपास कार्यात अडचणी येत असल्याने तपास कार्य थांबण्यात आलं होतं. सोमवारी सकाळी पुन्हा तपास कार्य सुरु झालं. सोमवारी सायंकाळच्या दोघांचे मृतदेह सापडले.

आठ तरूण पोहायला आले होते, त्यापैकी दोघांच बुडून मृत्यू झाला

रविवारी संध्याकाळी बदलापुरच्या बॅरेज धरण परिसरात उल्हासनगरच्या माणेरे गावातील आठ तरुण पोहण्यासाठी आले होते. या तरुणांपैकी देवेंद्र यादव (24) आणि रोहन वानखेडे (34) या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. मात्र अंधार असल्याने रात्री 9 वाजता ही शोधमोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर सोमवारी सकाळपासून पुन्हा ही शोधमोहिम सुरू करण्यात आली. यामध्ये रोहनचा मृतदेह सोमवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास हाती लागला. तर देवेंद्रचा मृतदेह रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वालीवली पुलाखाली आढळून आला. बॅरेज धरण परिसरात गेल्या आठ दिवसात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या भागात पोहायला जाण्यास बंदी घालण्याची आवश्यकता आहे.

हे सुद्धा वाचा

दोन तरुणांच्या घरच्यांना जोरदार धक्का बसला

मागच्या महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे बदलापूर आणि परिसरात देखील चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात अधिक पाण्याचासाठा आहे. रविवारी सायंकाळी पोहोयला गेलेल्या तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला आहे. दोन तरूण बुडाल्यामुळे परिसरात शांतता पसरली आहे. त्याचबरोबर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.  दोन तरुणांच्या घरच्यांना जोरदार धक्का बसल्याची माहिती मिळाली आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.