रिमोटवरुन भांडण, तीन वर्षांची मुलगी म्हणाली बाबाच बरोबर, आईने चिमुकलीला संपवलं

रिमोटवरुन भांडण, तीन वर्षांची मुलगी म्हणाली बाबाच बरोबर, आईने चिमुकलीला संपवलं
15 दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका, भररस्त्यात दगडाने ठेचून हत्या

तीन वर्षांची चिमुकली नेहमी आपल्या वडिलांची बाजू घेत असल्यामुळे 26 वर्षांची सुधा नेहमी नाराज असायची. (Bangalore Crime Mother Killed daughter )

अनिश बेंद्रे

|

Apr 08, 2021 | 1:16 PM

बंगळुरु : टीव्हीचा रिमोट कंट्रोल घेण्यावरुन पती-पत्नीत झालेल्या भांडणात तीन वर्षांच्या मुलीचा बळी गेला. चिमुकलीने बाबांची बाजू घेतल्यामुळे आईचा संताप झाला. रागाच्या भरात जन्मदात्रीनेच तीन वर्षांच्या लेकीची गळा दाबून हत्या केली. कर्नाटकातील बंगळुरुमध्ये हा हृदयाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. (Bangalore Crime News Mother Killed daughter over fight on Remote Control with Husband)

लेकीने वडिलांची बाजू घेतल्याचा राग

तीन वर्षांची चिमुकली नेहमी आपल्या वडिलांची बाजू घेत असल्यामुळे 26 वर्षांची सुधा नेहमी नाराज असायची. नुकतंच टीव्हीचा रिमोट कंट्रोल घेण्यावरुन पती-पत्नीत वाद झाला. सवयीप्रमाणे निरागस लेकीने वडिलांची बाजू घेतली. त्यामुळे आईच्या रागाला खतपाणी मिळालं. अखेर आरोपी महिलेने चिमुकलीला एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत नेलं. आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करुन तिने आपल्या मुलीचा गळा आवळला.

मुलगी हरवल्याचा बनाव

सुधा पश्चिम बंगळुरुतील टाईल्सच्या दुकानात हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून कार्यरत होती. तर तिचा पती इरन्ना हा माथाडी कामगार आहे. मुलीच्या हत्येनंतर सुधा ती बेपत्ता असल्याचं नाटक करत होती. पतीसोबत जाऊन तिने पोलिसात मुलीच्या बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली. मी मुलीला घेऊन चाटच्या दुकानात गोबी मंचुरिअन खायला गेले होते. दुकानदाराला पैसे देत असताना माझ्या नकळत चिमुकली हात सोडून कुठेतरी गेली, असा बनावही तिने रचला.

पोलिसांनी हिसका दाखवताच कबुली

दुसऱ्या दिवशी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत एका चिमुकलीचा मृतदेह सापडला. एका पादचाऱ्याने याविषयी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव गेतली. त्यानंतर सुधा आणि इरन्ना यांना बोलावून मुलीची ओळख पटवली. मात्र सुधाच्या बोलण्याचा पोलिसांना संशय आला. त्यांनी तिची कसून चौकशी केली.

चाटच्या दुकानात जाण्यावरुन खोदून खोदून विचारणा केली, तेव्हा सुधाने तोंड उघडलं. आपणच मुलीची गळा दाबून हत्या केल्याची कबुली तिने दिली. चिमुकली नेहमी आपल्या वडिलांची बाजू घेत असल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचं सुधाने सांगताच पोलीसही चक्रावले.

संबंधित बातम्या :

बॉयफ्रेण्डने विचारले ही मुलगी कुणाची, आईकडून रागात एक महिन्याच्या मुलीची हत्या

बारामतीत आंतरजातीय लग्न, आईकडून मुलीची डोक्यात दगड घालून हत्या

(Bangalore Crime News Mother Killed daughter over fight on Remote Control with Husband)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें