डोंबिवलीत मोबाईल चोरीच्या संशयावरुन निरपराधाला बेदम मारहाण, रक्तबंबाळ तरुणाला अखेर पोलिसांची मदत

मोबाईल चोरीच्या संशयावरुन डोंबिवलीत एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. संबंधित व्यक्तीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

डोंबिवलीत मोबाईल चोरीच्या संशयावरुन निरपराधाला बेदम मारहाण, रक्तबंबाळ तरुणाला अखेर पोलिसांची मदत


डोंबिवली : मोबाईल चोरीच्या संशयावरुन डोंबिवलीत एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. संबंधित व्यक्तीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी दोन जणांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे (Beating of a man on suspect of Mobile thief police arrest two people in Kalyan Dombivali).

अनेकदा अशी घटना समोर येते की, कोणाला तरी चोरीच्या संशयावरुन बेदम मारहाण केली जाते. अशा घटनांमध्ये काही जणांचा जीवही जातो. पोलीस कारवाईही करतात. मात्र, त्यानंतरही या घटना थांबलेल्या नाहीत. कल्याणमध्ये काही दिवसांपूर्वीच चोरीच्या संशयावरुन मारहाणीमध्ये काहींचा जीवही गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काही जण जखमी झाले आहेत.

ताजी घटना कल्याण पूर्व भागातील टिळक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. काही तरुणांनी एका व्यक्तीला मोबाईल चोरीच्या संशयावरुन बेदम मारहाण केली. कैलास नेवारे असं या पीडित व्यक्तीचं नाव आहे. मोबाईल चोरीच्या संशयावरुन मारुफ पोके आणि आसिफ शेख या तरुणांनी कैलासला मारहाण केली. कैलासने वारंवार त्याने चोरी केलेली नसल्याचं सांगितलं, तरी देखील 4 आरोपींनी त्याला मारहाण करुन रक्तबंबाळ केलं.

अखेर पीडित व्यक्ती मरेल या भितीपोटी ते स्वतः त्याला रस्त्यावर घेऊन आले. पोलिसांच्या मदतीने पीडित तरुणाला रिक्षात टाकून रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी टिळकनगरचे पोलीस निरिक्षक नारायण जाधव म्हणाले, “चोरीच्या संशयावरुन चार तरुणांनी कैलासला बेदम मारहाण केली. या प्रकरणी मारुफ आणि आसिफला अटक करण्यात आली आहे. अद्याप दोन आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय.

हेही वाचा :

AAP ला धक्का, आमदार सोमनाथ भारतींना 2 वर्षांचा तुरुंगवास, कारण काय?

Video: आधी त्यानं फुकटात पेट्रोल भरलं, कानशिलातही लगावली, नंतर पोलीस ठाण्यात शिवाीगाळ, बीडात सेना कार्यकर्त्याची गुंडगिरी

बीडमध्ये चित्रपटगृहासमोरच अभिनेता-दिग्दर्शकाला बेदम मारहाण

व्हिडीओ पाहा :

Beating of a man on suspect of Mobile thief police arrest two people in Kalyan Dombivali

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI