आधी मैत्रिणीची चाकूने वार करून हत्या, नंतर तिच्या घरात 21 वर्षीय तरुणाचा गळफास

तरुणीचे आई-वडील बाहेरगावी गेले होते, संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांना हे भयावह दृश्य पाहायला मिळालं. त्यांची मुलगी गळा चिरलेल्या अवस्थेत पडली होती, तर तरुण छताला लटकलेला दिसला

आधी मैत्रिणीची चाकूने वार करून हत्या, नंतर तिच्या घरात 21 वर्षीय तरुणाचा गळफास
क्राईम


बंगळुरु : 19 वर्षीय मैत्रिणीची चाकूने वार करून हत्या केल्यानंतर 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात उघडकीस आली आहे. गुरुवारी संध्याकाळी आरोपीने संबंधित तरुणी राहत असलेल्या घराच्या छताला गळफास लावून आपल्या आयुष्याची अखेर केली.

काय आहे प्रकरण?

संबंधित तरुणी बंगळुरुतील जिगानी येथील निसर्ग लेआउट येथे राहत होती. तिचे नाव डी सिंचना असल्याची माहिती आहे. तिचे वडील दोड्डाय्या यांचे आणेकलच्या हरपनहल्ली भागात हार्डवेअरचे दुकान होते. सिंचना ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. किशोर कुमार असे मृत आरोपीचे नाव असून तो एका गोदामासाठी ट्रक चालक म्हणून काम करत होता.

आई-वडील घरात नसताना हत्या

सिंचना ही बन्नेरघट्टा रोडवरील एका खासगी महाविद्यालयात प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती, असे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. दोड्डाय्या आणि त्यांची पत्नी बाहेरगावी गेले होते, संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांना हे भयावह दृश्य पाहायला मिळालं. त्यांची मुलगी सिंचनाचा गळा चिरलेल्या अवस्थेत पडली होती, तर किशोर छताला लटकलेला दिसला, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

सिंचनाच्या मृतदेहाजवळ अभ्यासाची पुस्तके आणि काही नोट्स सापडल्या, ज्यावरून ती घटनेच्या वेळी अभ्यास करत होती असा अंदाज लावला जात आहे.

संबंधित बातम्या :

कॅन्सरग्रस्त वडील, आजारी आई, पदरात दोन पोरं; व्हिडीओत खळबळजनक आरोप, अकोल्यात 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या

नको तिथं डोकं! खिडकीतून घुसण्यासाठी चोराने तीन महिन्यात 10 किलो वजन घटवलं, 37 लाखांवर डल्ला

लग्न ठरल्यानंतर अश्लील मेसेज पाठवणे हा भावी जोडीदाराच्या विनयशीलतेचा अपमान नाही : कोर्ट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI