AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंद खोलीच्या झरोक्यातून पाहिलं अन् दरवाजाच तोडला… नराधमाने कोर्टातून पळ काढताच असं कृत्य केलं की भिवंडी हादरली

भिवंडीत धक्कादायक घटना घडली आहे. एक सहा वर्षीय अल्पवयीन चिमुरडी दुपारी तीन वाजता शौचास चाळीच्या शौचालयात गेली होती. मात्र तिच्यावर अत्याचार करत तिचा खून झाल्याचे समोर आले आहे.

बंद खोलीच्या झरोक्यातून पाहिलं अन् दरवाजाच तोडला... नराधमाने कोर्टातून पळ काढताच असं कृत्य केलं की भिवंडी हादरली
Bhiwandi Crime
| Updated on: Oct 03, 2025 | 7:17 PM
Share

बुधवारी (1 ऑक्टोबर) भिवंडी शहरालगतच्या काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगत पाडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक सहा वर्षीय अल्पवयीन चिमुरडी दुपारी तीन वाजता शौचास चाळीच्या शौचालयात गेली होती. मात्र तिच्यावर अत्याचार करत तिचा खून झाल्याचे समोर आले आहे. हे कृत्य पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या एका आरोपीने केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गोणीत आढळला मृतदेह

भिवंडी शहरालगतच्या काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगत पाडा येथील सहा वर्षीय अल्पवयीन चिमुरडी दुपारी तीन वाजता शौचास चाळीच्या शौचालयात गेली होती. मात्र बराच वेळ झाला तरी ती माघारी न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यामुळे निजामपूर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली, त्यानंतर तिचा शोध सुरु केला. यावेळी नजिकच्या चाळीतील एका बंद खोलीच्या झरोक्यातून आता पाहण्याचा प्रयत्न केला असता चिमुरडीने शौचालयास जाताना सोबत नेलेली बादली दिसली. त्यावेळी नागरिकांनी खोलीचे कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी एका कोपऱ्यात प्लास्टिक गोणीत चिमुरडीचा मृतदेह आढळला. तिच्या तोंडात कुरकुरेही भरलेले आढळले.

सराईत गुन्हेगाराचे कृत्य

या घटनेनंतर पोलीसांनी आरोपीचा शोध सुरु केला असता हे कृत्य सलामत अन्सारी या आरोपीने केल्याचे समोर आले. याच गुन्हेगाराने 13 सप्टेंबर 2023 मध्ये फेणेगाव येथे चाळीतील सहा वर्षीय चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवत खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करत मृतदेह बादली मध्ये कोंबून पसार झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील नवादा येथून अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी कारागृहात केली होती.

या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीसाठी 4 ऑगस्ट 2025 रोजी भिवंडी न्यायालयात त्याला हजर करण्यासाठी पोलिसांना त्याला आणले होते. त्यावेळी पोलिसांची नजर चुकवून आरोपी सलामत हा पसार झाला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनावर अनेकांकडून टीका होत असताना बंदोबस्ताला असणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर पोलिस आरोपीचा शोध घेत असताना आरोपी भिवंडी परिसरातच ओळख लपवून वावरत होता.

तो काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगत पाडा येथील एका खोलीत भाड्याने राहण्यासाठी एक आठवडे पूर्वी राहण्यास आला होता. त्यानंतर त्याने 1 ऑक्टोबर रोजी हे दुष्कर्म केले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी फिरत असताना भोईवाडा पोलिस ठाणे हद्दीतील दिवाण शहा तलाव येथे आरोपी फिरत असताना पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

आरोपीला शिक्षा व्हाही

मृत मुलीच्या आईने सांगितले की, ‘मुलगी न सापडल्याने सुरवातीला नजिकच्या दुर्गादेवी मंडपात खेळत असल्याने दुर्लक्ष केले. पण संध्याकाळी सहा वाजता पर्यंत मुलगी न सापडल्याने घाबरून शोध सुरू केला तेव्हा नजिकच्या चाळीतील खोलीच्या छोट्या झरोक्यातून बघितल्यावर खोलीत मुलीच्या सोबत असलेली बादली आढळली. त्यावेळी आम्ही कुलूप तोडून बघितले तेव्हा मुलीचा मृतदेह आढळून आला. तिला आयजीएम रुग्णालयात घेऊन गेलो असता ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यालाही तसेच मारून टाकावे, तेव्हाच माझ्या मुलीच्या आत्म्याला व आम्हाला शांती मिळेल.’

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.