धक्कादायक! भोंदूबाबाकडून एका कुटुंबातील 4 महिलांवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भोंदू बाबानं वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करण्याच्या नावाखाली 4 महिलांवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. (Bhondu Baba Nagpur)

धक्कादायक! भोंदूबाबाकडून एका कुटुंबातील 4 महिलांवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या


नागपूर: भोंदूबाबानं मृत्यूची भीती दाखवत आणि आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याच्या नावाखाली 4 महिलांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करण्याच्या नावाखाली 4 महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटनेने नागपूरमध्ये खळबळ उडाली. नागपूरमधील पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. पीडित मुलीनं तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भोंदूबाबाला अटक केली असून अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Bhondu Baba assaults four women in on family of Nagpur)

आर्थिक अडचणीचा घेतला फायदा

नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला आहे. दुलेवाले बाबा नावाने हा मांत्रिक वावरत असून याच नाव धर्मेंद्र निनावे असं आहे. हा बाबा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. मुलीचे वडील आर्थिक अडचणीत आहेत ही गोष्ट या बाबा ने हेरली. बाबानं संबंधित व्यक्तीला अविवाहित मुलीच्या हाताने 21 वेळा पूजा केल्यास तुझ्यावरची भूत बाधा टाळू शकते असं सांगत जाळ्यात ओढलं. आर्थिक अडचणीतून बाहेर निघता येईल या आशेने तो तयार झाला आणि मग बाबाचा सगळं पराक्रम सुरू झाला.

दुलेवाले बाबाने संबंधित व्यक्तीची मुलगी ,आई आजी आणि मामीला वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करण्याच्या बहाण्याने नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाही तर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल अशी भीती त्याने प्रत्येकाला दाखवत त्यांच्यावर अत्याचार केले. प्रत्येक वेळी तो महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी नेत असल्यानं हा वेगळाच प्रकार असल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या भोंदू बाबा च्या मुसक्या आवळल्या आहेत.

नागपुरात घडलेला हा सगळा प्रकार अतिशय निंदनीय आहे. मात्र, असे बाबा समाजात असे कृत्य करतात तरी कसे आणि नागरिक यांच्या भूल थापा ना बळी पडतात कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी कोणत्याही अंधश्रद्धा आणि भूलथापांना बळी पडू नये, भोंदू बाबापासून सावध राहून त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असं आवाहन पारडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांनी दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली आहे. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या मांत्रिकाला नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत. ही घटना धक्कादायक घटना उघडकीस आल्यामुळं नागरिकांनी सतर्क होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या:

बाप, लखनौमधून लेकी पाठोपाठ नागपुरात आला, सासरच्यांनी काटा काढला!

परदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा, मुंबई पोलिसांची सुशिक्षित ठगाला अटक

(Bhondu Baba assaults four women in on family of Nagpur)

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI