AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा, मुंबई पोलिसांची सुशिक्षित ठगाला अटक

बदलत्या तंत्रज्ञानासोबतच नागरिकांची फसवणूक होण्याचेही नवनवे प्रकार समोर येत आहेत. मुंबई पोलिसांनी नुकतीच देशभरात शॉपिंग साईटवरून 22 हजार महिलांची फसवणूक करणाऱ्याला ठगाला अटक केलीय.

परदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा, मुंबई पोलिसांची सुशिक्षित ठगाला अटक
| Updated on: Jan 20, 2021 | 6:02 PM
Share

मुंबई : बदलत्या तंत्रज्ञानासोबतच नागरिकांची फसवणूक होण्याचेही नवनवे प्रकार समोर येत आहेत. मुंबई पोलिसांनी नुकतीच देशभरात शॉपिंग साईटवरून 22 हजार महिलांची फसवणूक करणाऱ्याला ठगाला अटक केलीय. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली. विशेष म्हणजे 32 वर्षीय आरोपी संगणकतज्ज्ञ असून त्याने परदेशात शिक्षण घेतलंय. त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग पैसे मिळवण्याच्या शॉर्टकटसाठी वापरला आणि आता सध्या तुरुंगाची हवा खात आहे (High Educated Engineer of Gujrat Fraud with 22 thousand women through fake Shopping website).

आरोपीने महिलांची फसवणूक करण्यासाठी महिलांसाठी असणाऱ्या अनेक शॉपिंग वेबसाईट्सचा उपयोग केला. या माध्यमातून त्याने विविध महिलांची 70 लाखांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. त्यामुळेच शॉपिंग संदर्भातील 11 वेबसाईट्स मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या रडारवर आहेत. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास करुन आणखी महिलांची फसवणूक होणार नाही यासाठी कारवाई होणार आहे. या प्रकरणात सायबर सेल अधिक तपास आहे.

‘व्यवसायात नुकसान झाल्यान कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरकडून चोरीचा मार्ग’

या प्रकरणावर बोलताना मुंबई सायबर सेलच्या डीसीपी डॉ. रश्मी करंदीकर म्हणाल्या, “एका तरुण इंजिनिअरला आम्ही गुजरातमधून अटक केलीय. तो उच्च शिक्षित असून युके येथून संगणक शास्त्राचं शिक्षण घेऊन आला होता. त्याची गुजरातमध्ये फॅक्टरी होती, बिझनेस होता. मात्र, मागील काही काळात त्याला त्याच्या व्यवसायात फार मोठं नुकसना झालं. ते नुकसान भरुन काढण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी त्याने शॉपी.कॉम नावाची फसवी वेबसाईट सुरु केली. या वेबसाईटवर चांगल्या वस्तू खूप कमी किमतीत मिळत असल्याचं दाखवलं जायचं. त्यामुळे अनेक ग्राहकांनी आकर्षित होऊन तेथे खरेदी केली. त्यासाठी ऑनलाईन पेमेंट केलं. मात्र, त्या वस्तू संबंधित ग्राहकांपर्यंत पोहचल्याच नाही.”

“या वेबसाईटवरुन ज्या थोड्या वस्तू ग्राहकांना मिळाल्या त्या देखील खराब आढळल्या. त्यामुळे व्यथित होऊन एका महिलेने आमच्याकडे तक्रार दाखल केली. यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल करुन या इंजिनिअर आरोपीला अटक केलीय. तपासात आरोपीने आतापर्यंत 22 हजार ग्राहकांना फसवल्याचं समोर आलंय. यातून त्याने लाखो रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास करताना अशाच इतरही काही वेबसाईट आढळून आल्यात. तेथे देखील ग्राहकांची फसवणूक होत आहे,” असंही रश्मी करंदीकर यांनी नमूद केलं.

यावेळी सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा फसव्या वेबसाईटपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय.

हेही वाचा :

कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तातडीने कारवाई करा, डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश

SBI बँकेसोबत 4736 कोटींचा घोटाळा, कंपनी आणि संचालकांच्या घरांवर छापा

सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक

High Educated Engineer of Gujrat Fraud with 22 thousand women through fake Shopping website

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.