उल्हासनगरमधील धक्कादायक घटना, लग्नाच्या वरातीत चाकू हल्ला

या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. रितेश शर्मा असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Ulhasnagar Knife attack at during Wedding)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:08 PM, 17 Jan 2021
उल्हासनगरमधील धक्कादायक घटना, लग्नाच्या वरातीत चाकू हल्ला

उल्हासनगर : एका क्षुल्लक कारणामुळे उल्हारनगरमध्ये लग्नाच्या वरातीत चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आहे. शुक्रवारी (15 जानेवारी) ही घटना घडली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. रितेश शर्मा असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Ulhasnagar Knife attack at during Wedding)

उल्हासनगरमध्ये कॅम्प नंबर 3 च्या खेमानी परिसरातून ही वरात विवाहस्थळी जात होती. यावेळी खेमानी येथील रस्त्यावरून ही वरात जात असताना एक दुचाकीस्वार दुचाकी चालवत येत होता. याच वेळी वरातीमधील एका व्यक्तीला दुचाकीची ठोकर लागली. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला.

यानंतर काही वेळाने दुचाकीस्वार तिथून निघून गेल्यावर तो आपल्यासोबत सहा ते सात लोकांना घेऊन गेला. यानंतर त्याने वरातीमधील वऱ्हाडयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने जवळ अलेल्या चाकूने रितेश शर्मा त्यांच्यावर वार केली. यात शर्मा त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. रितेश हे धुळ्याहून आपल्या मेव्हण्याच्या मुलाच्या लग्नासाठी उल्हासनगरला आले होते.

सध्या रितेश शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.(Ulhasnagar Knife attack at during Wedding)

संबंधित बातम्या : 

ज्वेलर्सच्या बाजूला भाजीचं दुकान उघडलं, दोन महिने मुक्काम, संधी मिळताच भगदाड पाडून दरोडा

अभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप, अदखलपात्र गुन्हा दाखल