लग्नाचा खर्च 2 कोटी, पहिल्यारात्रीच बायकोला समजलं, नवऱ्याला स्त्रियांपेक्षा….हादरवून टाकणारं सत्य समोर आलं
एखादी मुलगी डोळ्यात खूप स्वप्न साठवून लग्न करते. कुठल्याही जोडप्याच्या आयुष्यात हनीमूनचा काळ खूप महत्त्वाचा असतो. कारण त्यावेळी पती-पत्नी परस्परांजवळ मोकळेपणाने व्यक्त होतात. आता असचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

लग्न करणं कुठल्याही मुलीच स्वप्न असतं. प्रत्येक मुलीची इच्छा असते, नवऱ्याच्या रुपात तिला परफेक्ट पार्टनर मिळावा. अनेकदा मुलींना काही बाबतीत जुळवून सुद्धा घ्यावं लागतं. पण कुठल्या बाबतीत जुळवून घ्यायच, याला सुद्धा मर्यादा असतात. मुलीला समजलं की, तिने ज्या मुलाशी लग्न केलय तो गे आहे, मग? म्हणजे त्याला महिलांमध्ये नाही, पुरुषांमध्ये रुची आहे. बिहारच्या बेगूसरायमध्ये असच एक प्रकरण समोर आलं आहे. इथे एका नववधूने डोळ्यात भरपूर सारी स्वप्न साठवून लग्न केलं. मोठ्या अपेक्षेने ती सासरी आली. पण लग्नानंतर काही दिवसात नवरीला पतीबद्दल असं सत्य समजलं की, तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
सिंघौल पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलय की, लग्नावर 2 कोटी रुपये खर्च आला. लग्नानंतर तिला समजलं की, नवरा समलैंगिक आहे. महिलेने तिच्या तक्रारीत सासरच्या मंडळींवर आरोप केलाय की, मोठ्या हुंड्यासाठी फसवून तिचं लग्न केलं.
या घटनेची सर्वत्र चर्चा
पोलिसांनी महिलेच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केलाय. तपास सुरु आहे. महिलेने तिच्या तक्रारीत आरोप केलाय की, सासरकडची मंडळी हुंड्यासाठी तिचा छळ करायचे. महिलेने सांगितलं की, जेव्हा तिला समजलं की, नवरा समलैंगिक आहे, त्यावेळी तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. लवकरच आरोपींविरोधात कारवाई होईल. आता या घटनेची सर्वत्र चर्चा आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत, जिथे लग्नानंतर पती आणि पत्नीबद्दलची सिक्रेट समोर आली आहेत.
त्यानंतर ही गोष्ट रोज होऊ लागली
माझं लग्न ठरलं, त्यावेळी नवरा खूप गोड, गोड बोलायचा. मला वाटलं की, मला मिस्टर परफेक्ट मिळालाय. पण लग्नानंतर हनीमूनच्यावेळी नवऱ्याने मला स्पर्श सुद्धा केला नाही. मला ही गोष्ट खटकली. पण मी स्वत:लाच समजावलं. त्यानंतर ही गोष्ट रोज होऊ लागली. त्यानंतर मला समजलं की, माझा नवरा गे आहे. मला ही गोष्ट सहन झाली नाही. सासरी मी याबद्दल बोलली, तेव्हा कोणी माझं समर्थन केलं नाही. उलट माझाच अपमान केला.