लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाला एक फोन आला अन् तो घरातून गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही; तरुणासोबत काय घडलं?

लग्न सोहळा संपन्न झाला, नववधूला घेऊन वरात सासरी आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेवाला एक फोन आला आणि तो घरुन गेला. मात्र त्यानंतर तो कधीच परतला नाही.

लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाला एक फोन आला अन् तो घरातून गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही; तरुणासोबत काय घडलं?
लग्नानंतर दोन दिवसातच नवरदेवाचा मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 10:40 AM

गया : बिहारमधील गयामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर दोनच दिवसात नववधूवर विधवा होण्याची वेळ आली आहे. लग्नाच्या दोनच दिवसानंतर नवदरेवाला एक फोन आला आणि तो घरातून निघून गेला. मात्र त्यानंतर थेट त्याचा मृतदेहच नाल्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गुरुआ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. अशोक कुमार असे हत्या झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. अशोक कुमारला नेमका कुणाचा फोन आला?, त्याची हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

लग्नानंतर दोन दिवसांनी घरुन गेला तो परतलाच नाही

पलुहारा पंचायतीच्या लकराही गावात राहणारा अशोक यादव हा व्यवसायाने कंत्राटदार होते. अशोकचे 29 मे रोजी लग्न होते आणि 30 मे रोजी वरात घरी आली. त्यानंतर 31 मे रोजी सायंकाळपासून ते बेपत्ता झाले. 31 मे रोजी संध्याकाळी कोणीतरी त्याला त्याच्या मोबाईलवर कॉल केला, त्यानंतर तो निघून गेला. परंतु त्यानंतर तो परतलाच नाही. दरम्यान, गुरुवारी पहाटे त्याचा मृतदेह गुनेरी पंचायतीच्या कालव्याच्या काठावर आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी विशेष टीम

मृतदेहावर अनेक ठिकाणी धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. घटनास्थळावरून मृताचा मोबाईल आणि एक दुचाकीही सापडली आहे. अशोकची हत्या कोणी केली? का केली? याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. शहर एसपीने हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, लग्नानंतर दोनच दिवसांनी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.