“बलात्कार पीडिता कुठेय?” “सध्या अंधेरी स्टेशनवर दिसते” मुंबई पोलिसांच्या उत्तराने जस्टिस डांगरे भडकल्या

"तपास अधिकाऱ्यांनी पीडित युवतीचं वय समजावं, यासाठी वैद्यकीय चाचणी करण्याचेही कष्ट घेतले नाहीत का?" असा सवाल जस्टिस भारती डांगरे यांनी विचारला (High Court Mumbai Police Rape )

बलात्कार पीडिता कुठेय? सध्या अंधेरी स्टेशनवर दिसते मुंबई पोलिसांच्या उत्तराने जस्टिस डांगरे भडकल्या
कोर्ट
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 12:11 PM

मुंबई : जवळपास अडीच वर्ष जुन्या बलात्कार प्रकरणाच्या तपासावरुन मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान मुंबई पोलिसांना फटकारलं अल्पवयीन बलात्कार पीडितेला शोधून आणण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने ‘बलात्कार पीडिता कुठेय?’ असा सवाल मुंबई पोलिसांना विचारला होता. त्यावर ‘ती सध्या प्लॅटफॉर्मवर दिसते’ असं उत्तर मिळाल्याने कोर्टाने पोलिसांना चांगलंच झापलं. तपासकर्त्यांना कायद्याचं ज्ञान नाही का, बलात्कार पीडितेला पुनर्वसनगृहात पाठवण्याऐवजी सोडून कसं दिलं, असा सवाल कोर्टाने विचारला. ‘आज तक’च्या वेबसाईटवर यासंबंधी वृत्त देण्यात आलं आहे. (Bombay High Court orders Mumbai Police to trace Rape Victim)

रिक्षात तरुणीवर बलात्कार झाल्याचा आरोप

2018 मधील बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यावेळी मुंबईत धावत्या रिक्षात दोघांनी अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला होता. जून 2018 मध्ये एका पादचाऱ्याने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या माहितीनुसार त्याने रिक्षातून एका युवतीचा आरडाओरडा ऐकला होता. रिक्षाच्या चारही बाजूंना काळे पडदे होते. पादचाऱ्याने रिक्षा थांबवली, तेव्हा एक व्यक्ती तरुणीवर जबरदस्ती करत असल्याचं त्याला दिसलं. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आलं.

त्यावेळी पीडितेने आपलं वय 16 वर्ष असल्याचं सांगितलं होतं. घटनेच्या दुसऱ्या दिवशी तिला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिने नकार दिला होता. मात्र 2 जुलै 2018 रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि 8 दिवसांनी तिला डिस्चार्ज देण्यात आलाय डिस्चार्ज रिपोर्टमध्ये तरुणीचा आधी गर्भपात झाल्याचं समोर आलं. यासोबतच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

पीडिता अल्पवयीन नसल्याचा दावा

हायकोर्टात आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला, तेव्हा त्यांच्या वकिलांनी पीडित तरुणी अल्पवयीन नसल्याचा दावा केला. त्याचप्रमाणे तिच्या सहमतीने लैंगिक संबंध आल्याचाही दावा वकिलांनी केला. त्यावर, “तपास अधिकाऱ्यांनी पीडित युवतीचं वय समजावं, यासाठी वैद्यकीय चाचणी करण्याचेही कष्ट घेतले नाहीत का?” असा सवाल जस्टिस भारती डांगरे यांनी विचारला. (Bombay High Court orders Mumbai Police to trace Rape Victim)

मुंबई पोलिसांच्या उत्तराने जज भडकल्या

‘बलात्कार पीडिता कुठेय?’ असा सवाल जस्टिस डांगरे यांनी मुंबई पोलिसांना विचारला. त्यावर तपास अधिकाऱ्यांनी तिला आताही अंधेरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पाहिलं जातं, असं उत्तर दिलं. त्यावर जस्टिस डांगरे यांनी संताप व्यक्त केला. “ज्या युवतीसोबत बलात्कार झाला आहे, तिला तुम्ही रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर सोडून दिलंत ही हैराण करणारी गोष्ट आहे. आपल्याकडे कायदे आहेत, काही जबाबदाऱ्या आहेत. त्यानुसार कुणाचेही शोषण होऊ नये, हे सुनिश्चित केलं जातं. मात्र तपास अधिकाऱ्यांना कायद्याची माहितीच नसल्याचं दिसतं. पीडितेला सुधारगृह किंवा पुनर्वसन केंद्रात नेलं नाही. जर तरुणी अल्पवयीन होती, तर बाल हक्क समितीची मदत घ्यायला हवी होती. मात्र हे काहीच घडलं नाही” अशा शब्दात जस्टिस डांगरे यांनी नाराजी व्यक्त केली.

आरोपी गेल्या 33 महिन्यांपासून तुरुंगात आहे, त्यामुळे त्याने जामिनासाठी याचिका केली होती. मात्र जस्टिस डांगरे यांनी संपूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत थांबण्यास सांगितलं. “तपास अधिकारी कोर्टात असल्याने पीडितेला शोधण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली जातील, अशी आशा आहे. जर पीडितेच्या वयाबाबत कुठलीही कागदपत्र नसतील, तर तिचं योग्य वय समजण्यासाठी तिची चाचणी घेणं आवश्यक आहे.” असंही जस्टिस डांगरे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मित्राच्या गर्लफ्रेण्डला दारु पाजून बलात्कार, नागपुरात तरुणाला बेड्या

मॉडेलिंगचं काम देतो सांगत फसवलं, आधी गेस्ट हाऊसला बोलावलं, नंतर जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार

(Bombay High Court orders Mumbai Police to trace Rape Victim)

Non Stop LIVE Update
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.