Jalgaon Crime | ‘भाई का बड्डे’ गाण्यावर राडा, हवेत तलवार नाचवली; जळगावात बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला इंगा

Jalgaon Crime | 'भाई का बड्डे' गाण्यावर राडा, हवेत तलवार नाचवली; जळगावात बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला इंगा
JALGAON BIRTHDAY CELEBRATION

तलवारीने केक कापून झाले बर्थडे सेलिब्रेशन (Birthday Celebration) करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाला जळगाव (Jalgaon Crime) पोलिसांनी अटक केलं आहे. आपल्या बर्थडेच्या दिवशीच त्याला तुरुंगात रात्र काढावी लागलीय. आपल्या मित्रांच्या मदतनीने भाई का बड्डे या गाण्यावर हा तरुण हातात तलवार नाचवत होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 26, 2022 | 2:04 PM

जळगाव : तलवारीने केक कापून बर्थडे सेलिब्रेशन (Birthday Celebration) करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाला जळगाव (Jalgaon Crime) पोलिसांनी अटक केलं आहे. आपल्या बर्थडेच्या दिवशीच त्याला तुरुंगात रात्र काढावी लागलीय. मित्रांच्या मदतनीने भाई का बड्डे या गाण्यावर हा तरुण हातात तलवार नाचवत होता. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी (Police) शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तलवार हातात घेऊन बर्थडे साजरा करणे या तरुणाला चांगलेच महागात पडले आह.

तलवारीने कापला केक, तलवार हवेत फिरवली

मिळालेल्या माहितीनुसार 24 वर्षीय पंकज चौधरी आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत मित्राच्या खांद्यावर बसून ‘भाई का बड्डे’ गाण्यावर नाचत होता. त्याच्या हातात तलवार होती. तसेच मित्रांच्या गराड्यामध्ये तो तलावरीने केक कापत होता. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. मोठ्या थाटात साजऱ्या केलेल्या या तरुणाचा व्हिडीओ नंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा प्रकार नंतर चर्चेचा विषय ठरल्यानंतर पोलिसांनी ‘बर्थ डे बॉय’चा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पंकज भानुदास चौधरी असे अटक केलेल्या ‘बर्थ डे बॉय’चे पूर्ण नाव आहे. जोशात असलेल्या या बड्डेबॉयला वाढदिवसाची रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागली.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई 

जळगाव शहरातील चौगुल प्लॉट भागात पंकज चौधरी याचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी डीजेच्या तालावर ‘भाईचा बड्डे’ गाण्यावर नाच करणाऱ्या पंकजला मित्रांनी डोक्यावर उचलून घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. नाचत असताना पंकजच्या हातात तलवार देखील दिसत आहे. नंतर जोशात आलेल्या या ‘बर्थ डे बॉय’ने तलवार हवेत भिरकवायला सुरुवात केल्याचं दिसतंय. दोघा मित्रांनी हातात केक घेऊन पंकजपर्यंत पोहोचवला. पंकजने नाचत असतानाच तलवारीने केक कापल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. हा सर्व प्रकार वाढदिवसाला हजर असलेल्या तरुणांनी मोबाइलच्या कॅमेरात चित्रीत केला होता. आता बर्थडे असलेल्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या:

Nashik | महिला वैद्यकीय अधिकारी कारमध्ये जळून खाक; कोळसा झालेली सापडली हाडे, घातपात की अपघात?

Pune Crime| दारू पिण्याच्या वाद इतका टोकाला गेला कि तीक्ष्ण हत्याराने भोकसून केली हत्या

Wife Murder | अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद, अखेर पतीनेच पत्नीला संपवलं, कोल्हापुरात खुनाचा थरार

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें