Nashik | महिला वैद्यकीय अधिकारी कारमध्ये जळून खाक; कोळसा झालेली सापडली हाडे, घातपात की अपघात?

डॉ. सुवर्णा वाजे-जाधव या गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. तेव्हा मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली.

Nashik | महिला वैद्यकीय अधिकारी कारमध्ये जळून खाक; कोळसा झालेली सापडली हाडे, घातपात की अपघात?
महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची जळून खाक झालेली गाडी.
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 1:38 PM

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेच्या (Municipal Corporation) वैद्यकीय अधिकारी (Medical officer) डॉ. सुवर्णा वाजे-जाधव यांचा कारमध्ये जळून मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. वाजे या मोरवाडी रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांचा नाशिकमधील वाडीवऱ्हे परिसरातील एका वाहनात मृतदेह सापडला आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी सध्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत. नेमका हा प्रकार कशाचा आहे, घातपात की आणखी काही, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, या घटनेने महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

तीन दिवसांपासून बेपत्ता…

डॉ. सुवर्णा वाजे-जाधव या गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. तेव्हा मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ही हाडे सुद्धा त्यांची असल्याची समजते. वाडीवऱ्हे पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी अधिक तपास सुरू केला आहे. घटनास्थळावर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. त्यांनी तपास कार्य सुरू केले आहे. मात्र, अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडतो काय, याबद्दल तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये भीती

नाशिकमध्ये आज सगळीकडे प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. महापालिकेतही हा उत्साह होता. सारे ध्वजारोहण समारंभात व्यस्त होते. मात्र, काही वेळातच महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाझे-जाधव यांचा मृतदेह आढळल्याची बातमी येऊन धडकली आणि साऱ्यांनाच धक्का बसला. त्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. नाशिकमध्ये भयंकर वेगाने गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत तरी एकाच आठवड्यात तीन खून झालेले नाशिककरांनी पाहिले. मात्र, आता चक्क एका महिला अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याने भीतीची वातावरण आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा लवकरात लवकर तपास करावा. हा घातपाताचा प्रकार आहे की, आणखी काही याचा शोध घ्यावा, असा सूर महापालिका कर्मचाऱ्यांमधून निघत आहे.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

Non Stop LIVE Update
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...