प्रेयसीचे लग्न होताच प्रियकराचा डेंजर प्लॅन; त्या पार्सलमध्ये होते काय, एकच थरार, हादरलं कुटुंब
Crime News : प्रेयसीने लग्न केल्याने प्रियकराच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजला. प्रेयसीच्या नवऱ्यासह त्याच्या कुटुंबियांना संपवण्यासाठी मग त्याने भयंकर कट रचला. त्याने एक पार्सल पाठवले. काय होते त्या पार्सलमध्ये?

प्रेयसीचे लग्न झाल्यापासून त्याचे चित्त काही थाऱ्यावर नव्हते. तिच्या लग्नाला 40 दिवस होत आले होते. मग त्याच्या डोक्यात एक भयंकर कट शिजला. प्रेयसीचा पती आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचे त्याने ठरवले. त्यासाठी त्याने जे केले ते भयंकर होते. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्यावर त्यांनाही धक्का बसला. इकडं जर असं अक्रित झालं असतं तर कुटुंबात कोणीच वाचलं नसत्या या विचारानंच ते कुटुंब हादरला. काय होतं त्या पार्सलमध्ये?
काय आहे प्रकरण?
छत्तीसगडमधील खैरागड छुईखदान गंडई जिल्ह्यातील या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा केला आहे. येथे एका प्रियकराने प्रेयसीचा नवरा आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे. सध्या पोलिस या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. प्रेयसीच्या लग्नाला 40 दिवस झाले तरी ती परत येत नसल्याने प्रियकराने एक मोठा कट रचला. त्याने तिच्या सासरी एक पार्सल पाठवलं. त्यात एक बॉम्ब होता.
शाळेपासून प्रेमकहाणी
कुसमी गावातील 20 वर्षीय आरोपी विनय याचे गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. शाळेपासून त्यांचे प्रेम होते. त्याच्या प्रेयसीचे लग्न झाले. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. 40 दिवस उलटूनही प्रेयसी परत न आल्याने मग त्याने प्रेयसीचा नवरा आणि कुटुंबाला ठार करण्याची योजना आखली. त्याने ऑनलाईन बॉम्ब कसा तयार करायचा याचा शोध घेतला आणि 2 किलो आयईडी लावलेले डेटोनेटर प्लग त्याला जोडली. त्यानंतर खोटा इंडिया पोस्टचा लोगो आणि शिक्के मारून ते पार्सल प्रेयसीच्या सासरी पाठवले. पण याची कुणकुण प्रेयसीच्या पतीला लागली. त्याला याविषयीची शंका अगोदरच आली होती. त्याने ते पार्सल फोडले नाही. त्याने पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी बॉम्ब निकामी केला. या प्रकरणात 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात विनय याचा पण समावेश आहे. त्याने मित्राच्या मदतीने हा भयंकर कट रचला. पण हा बॉम्बस्फोट झाला असता तर अख्ख कुटुंबच त्यात ठार झालं असतं असा दावा करण्यात येत आहे.
