AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरी पळाली, मग मेहुणीसोबतच लग्न! तिच्याबद्दल सत्य कळताच…; नवऱ्यासोबत भयंकर घडलं!

लग्नाआधीच वधू आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. आपली इज्जत वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांनी तिच्या धाकट्या बहिणीशी लग्न ठरवले, पण ऐनवेळी धाकट्या बहिणीबाबत जी गोष्ट समोर आली ती ऐकून धक्काच बसला.

नवरी पळाली, मग मेहुणीसोबतच लग्न! तिच्याबद्दल सत्य कळताच...; नवऱ्यासोबत भयंकर घडलं!
सांकेतिक फोटोImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 07, 2026 | 4:42 PM
Share

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीचा कुटुंबियांनी निकाह ठरवला होता. सर्व तयारी झाली होती. मुलीसाठी दागिने करण्यात आले. त्यानंतर सर्वजण निकाहसाठी घरी आले. पण अचानक नवरी मुलगी पळून गेली. त्यानंतर कुटुंबाची इज्जत जाऊ नये म्हणून दोन्हीकडच्या मंडळींनी तिच्या लहान बहिणीशी निकाह करुन देण्याचे ठरवले. पण नंतर अशा काही गोष्टी समोर आल्या की दोन्ही गटांमध्ये जोरदार मारामारी सुरु झाली. आता नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या…

उत्तर प्रदेशातील बरेलीच्या बिथरी चैनपूर परिसरातील एका गावातील तरुणीचे लग्न जवळच्याच गावातील एका तरुणाशी ठरले होते. शनिवारी नरियावल येथील एका हॉलमध्ये निकाहाची तयारी सुरू होती. दोन्ही कुटुंबे आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. याच दरम्यान, शुक्रवारी रात्री नवरी अचानक घरातून बेपत्ता झाली. ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे कुटुंबीयांना समजले. असे सांगितले जात आहे की, घरातून जाताना तरुणीने स्वतःसोबत दागिनेही नेले होते.

नवरी पळून गेल्याची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ उडाली. हे प्रकरण नवरदेवाच्या बाजूला समजताच दोन्ही कुटुंबातील लोक आमनेसामने आले. लग्न मोडण्याची वेळ आली. यानंतर नातेवाईक आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी अनेक तास पंचायत केली. बऱ्याच चर्चेनंतर आणि समजूत घातल्यानंतर दोन्ही बाजू या गोष्टीवर सहमत झाल्या की, नवरीच्या लहान बहिणीचा निकाह नवरदेवाशी लावून द्यावा, जेणेकरून लग्नही पार पडेल आणि दोन्ही कुटुंबांची प्रतिष्ठाही राखली जाईल.

लहान बहिणीची बाब समोर येताच वातावरण बिघडले

शनिवारी ठरलेल्या वेळेवर वरात नरियावलच्या हॉलमध्ये पोहोचली. निकाहाच्या विधीची तयारी सुरू झाली होती. त्याचवेळी कोणीतरी नवरदेवाच्या कुटुंबीयांना माहिती दिली की, ज्या लहान बहिणीसोबत निकाह ठरला आहे, तिचेही एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू असून तिचीही हे लग्न करण्याची इच्छा नाही. हे ऐकताच नवरदेवाकडील लोक संतापले. त्यांनी यावर आक्षेप घेतला. बघता बघता दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच वाद इतका वाढला की लोक एकमेकांवर हल्ला करू लागले. विवाहस्थळी लाठ्या-काठ्यांचा वापर झाला आणि जोरदार दगडफेकही झाली. लग्नाचे वातावरण पूर्णपणे तणाव आणि गोंधळात बदलले.

तीन जण जखमी, पोलिसांनी चार जणांना घेतले ताब्यात

या हाणामारीत लग्नसोहळ्याला आलेली नवरीची चुलत बहीण, तिचा दीर आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. गोंधळ आणि हाणामारीनंतर लग्न पूर्णपणे रद्द करण्यात आले. वरात नवरीविनाच माघारी परतली.

बिथरी चैनपूरचे एसओ (SO) राजेश मिश्रा यांनी सांगितले की, ज्या तरुणीचा निकाह होणार होता, ती आपल्या प्रियकरासोबत निघून गेली होती. त्यानंतर तिच्या लहान बहिणीशी निकाह लावण्याची चर्चा झाली, परंतु तिचेही प्रेमप्रकरण समोर आल्यावर दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. या हाणामारीत दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...