मोठ्या जल्लोषात लग्न केलं, महिन्याभरात 15 लाखांचे दागिने घेऊन नवरी बॉयफ्रेंडसोबत फरार, सीसीटीव्हीत घटना कैद

मोठ्या जल्लोषात लग्न केलं, महिन्याभरात 15 लाखांचे दागिने घेऊन नवरी बॉयफ्रेंडसोबत फरार, सीसीटीव्हीत घटना कैद
प्रातिनिधिक फोटो

एका तरुणाच्या आयुष्यात नवी नवरी आली. पण लग्नानंतर अवघ्या एक महिन्यातच ती नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियाला चुना लावून पळून गेली (Bride runs away with boyfriend with rupees 15 lakh).

चेतन पाटील

|

May 30, 2021 | 7:40 PM

लखनऊ : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. लग्नानंतर आपल्या जोडीदाराने आपल्यासोबत प्रत्येक सुखदु:खात सोबत राहावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गोरखपूरच्या एका तरुणाच्या आयुष्यात नवी नवरी आली. पण लग्नानंतर अवघ्या एक महिन्यातच ती नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियाला चुना लावून पळून गेली. घरातील साडे तेरा लाखांचे दागिने आणि पावणे दोन लाख रुपये रोख रक्कम असा एकूण जवळपास 15 लाखांचा ऐकज घेऊन ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली (Bride runs away with boyfriend with rupees 15 lakh).

लॉकडाऊनमध्ये लग्न

संबंधित घटना ही गोरखपूरच्या राजघाट पोलीस स्टेशन हद्दीतील तुर्कमानपूर पटवारी टोला येथील आहे. या परिसरात राहणाऱ्या मनीष कुशवाह नावाच्या तरुणाचं 27 एप्रिल 2021 रोजी गंगा कुशवाह नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. गंगा कुशवाह हिच्या आई-वडिलांचं लहानपणीच निधन झालं होतं. त्यामुळे तिचं पालणपोषण तिच्या मावशीच्या घरी झालं. तिच्या तीन मावस भावांनी मनीष याच्यासोबत तिचं लग्न ठरवलं होतं. मनीष आणि गंगाचं 27 एप्रिलला लॉकडाऊनच्या सर्व नियमांचं पालन करुन लग्न लावण्यात आलं (Bride runs away with boyfriend with rupees 15 lakh).

नवविवाहीत नवरी 15 लाखांचा ऐवज घेऊन पळाली

लग्नानंतर नवरी गंगा ही पतीच्या घरी गेली. तिच्या सासरी काही पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर ती रितीरिवाजानुसार माहेरी गेली. त्यानंतर ती पुन्हा सासरी आली. पण सासरी आल्यानंतर अवघ्या चार दिवासांनी ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. विशेष म्हणजे ती कुशवाह यांच्या घरातील 15 लाखांचा ऐवज घेऊन पसाल झाली.

सीसीटीव्हीत गंगाचे पळून जाण्याचे दृश्य कैद

गंगा ही 27 मे रोजी रात्री पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली. घरातील इतर सदस्यांनी जेव्हा गंगाचा शोधाशोध सुरु केला तेव्हा संबंधित प्रकार उघड झाला. त्यानंतर घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आला. यामध्ये गंगा आपल्या बॉयफ्रेंडसोबत घरातून निघते आणि घराचा दरावाजा बंद करताना स्पष्टपणे दिसते.

पोलिसांची कारवाई सुरु

याप्रकरणी गंगाचा पती मनिष कुशवाह पोलिसात जातो. कुशवाह कुटुंबाने पोलिसांकडे गंगाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे मनिष याने आपल्या पत्नीला अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलताना पकडलं होतं. लग्नानंतर तिने त्याच्याशी बोलणं थांबवावं, अशी विनंती त्याने अनेकदा तिला केली होती. मात्र, तिने त्याचा नांद सोडला नाही, अखेर ती त्याच्यासोबत पळून गेली. मनिषने गंगाच्या बॉयफ्रेंडचं नाव आणि पत्ता देखील पोलिसांकडे दिला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सध्या सुरु आहे.

हेही वाचा : कंगना रनौतच्या वैयक्तिक अंगरक्षकाला बेड्या, लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याचा आरोप

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें