AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम केल्याची शिक्षा, भावाने बहिणीला डोंगरावरून ढकललं; कुठे घडला ऑनर किलींगचा थरारक प्रकार ?

एका 17 वर्षीय मुलीचा तिच्या चुलतभावाने खून केला. मुलीने वेगळ्या जातीच्या मुलावर प्रेम केल्याने तिचा भाऊ रागावला आणि तिला 200 फूट उंच डोंगरावरून खाली ढकलले. ही 'ऑनर किलिंग'ची घटना आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने महाराष्ट्र हादरला .

प्रेम केल्याची शिक्षा, भावाने बहिणीला डोंगरावरून ढकललं; कुठे घडला ऑनर किलींगचा थरारक प्रकार ?
प्रेमाची भावाने बहिणीला दिली शिक्षा, दरीत ढकलून दिलं
| Updated on: Jan 08, 2025 | 12:31 PM
Share

प्रेम… ही जगातील सर्वात चांगली, महत्वाची भावना समजली जाते, आप्लायवर कोणीतरी प्रेम करावं, असं जगातील प्रत्येत व्यक्तीला वाटत असतं. पण याच प्रेमामुळे एखाद्याचा जीव गेला तर ? प्रेम करण्याची जीवघेणी शिक्षा कोणी दिली तर कोणाकडे दाद मागायची ? आपल्या बहिणीने गावातील एक तरूणावर प्रेम केल्याने एका भावाला एवढा प्रचंड राग आला की त्याने त्याच्या बहिणीलाच प्रेम करण्याची शिक्षा देत तिला 200 फूट उंच डोंगरावरून खाली खोली दरीत ढकलून दिलं. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथे घडली असून त्यामध्ये अवघ्या 17 वर्षांच्या त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे. मृत मुलगी ही त्याची चुलत बहीण होती. ‘ऑनर किलींग’च्या या घटनेने फक्त वाळूजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून मोठी खळबळ उडाली आहे.

200 फूट डोंगरावरून खाली ढकललं

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,वडगाव येथील अवघ्या 17 वर्षांची असलेली ही मुलगी 12 वीमध्ये शिकत होती. तिचे एका वेगळ्या जातीतील मुलावर प्रेम होतं. ती त्याच्यासोबत पळूनही गेली होती, मात्र तिच्या घरच्यांना हे मुळीच आवडलं नव्हतं. त्यांनी त्या मुलीची कशीबशी समजूत काढून तिला घरी आणलं होतं. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला वाळूज परिसरातील वळदगाव येथे तिच्या काकांकडे पाठवलं होतं. काकांनी व तिच्या चुलतभावाने, ऋषीकेशने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.

फिरायला नेतो सांगितलं आणि…

मात्र तरीही ती मुलगी ऐकत नव्हती. घटनेच्या दिवशी त्या मुलीचा चुलत भाऊ ऋषीकेश हा तिला फिरायला घेऊन गेला. तो तिला सोलापूर-धुळे महामार्गाजवळील खवड्या डोंगरावर घेऊन गेला. तिथेही त्याने त्या मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती काहीच ऐकत नव्हती, हे पाहून तिच्या भावा खूप राग आला. आणि त्याच रागाच्या भरात त्याने त्याच्या बहिणीला डोंगरावरून खाली दरीत ढकलून दिलं. त्यामुळे त्या तरूणीचा मृत्यू झाला.

बहिणीला ढकलून तो डोंगरावरन खाली येत होता, तेव्हा तिथे क्रिकेट मॅच सुरू होती. तेथील ड्रोनमध्ये तो आरोपी तरूण कैद झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.