AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकृत नवऱ्याने लावले बायकोचे गावभर पोस्टर्स; मजकूर वाचाल तर धक्काच बसेल

एका विकृत नवऱ्याने सार्वजनिक ठिकाणी तिचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Buldhana husband puts posters of his wife all over the village)

विकृत नवऱ्याने लावले बायकोचे गावभर पोस्टर्स; मजकूर वाचाल तर धक्काच बसेल
Buldhana husband puts posters wife
| Updated on: Mar 14, 2021 | 1:23 PM
Share

बुलडाणा : संताप आणि विकृती माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे घडलं आहे. पत्नी घटस्फोट देत नसल्याने एका विकृत नवऱ्याने सार्वजनिक ठिकाणी तिचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुलडाण्यातील चिखली तालुक्यात ही घटना घडली आहे. समाधान निकाळजे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. (Buldhana husband puts posters of his wife all over the village)

नेमकं प्रकरणं काय?

गेल्यावर्षी 30 जूनला समाधान याचा विवाह अंचरवाडी येथील एका मुलीशी विवाह झाला. पण तो त्याच्या पत्नीवर सतत संशय घेत होता. त्यावरुन तो बायकोला सतत शाररिक आणि मानसिक त्रास देत होता. त्यामुळे त्याची पत्नी दिवाळीच्या दरम्यान माहेरी निघून गेली. त्यानंतर समाधान निकाळजेने घटस्फोट मिळावा, यासाठी स्वतःच्या बायकोचे फोटोचे पोस्टर बनवून सार्वजनिक ठिकाणी लावले.

या पोस्टर्सवर “गरज पडल्यास संपर्क साधा” असं लिहिले आहे. त्यावर काही मोबाईल नंबरही दिले आहेत. याबद्दल विवाहितेच्या भावाने त्याला जाब विचारला. जोपर्यंत घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत एसटी, बस ,रेल्वे स्टेशन, सगळीकडे फोटो लावून बदनामी करेन, अशी धमकी दिली आहे.

विशेष म्हणजे या विकृत व्यक्तीने जर घटस्फोट दिला नाही, तर पत्नीच्या बहिणीचे आणि सासूचे ही पोस्टर्स लावून त्यांची बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली आहे.

आरोपी अदखलपात्र गुन्हा दाखल

समाधान निकाळजे असे यात आरोपीचे नाव आहे. त्यामुळे महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन अंढेरा पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे प्रकरण गंभीर असल्याने अंढेरा पोलिसानी अदाखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.  अद्याप या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारे पत्नीचे पोस्टर लावून त्याखाली नंबर लिहिणे चुकीचे आहे, असेही काहींचे म्हणणं आहे.

(Buldhana husband puts posters of his wife all over the village)

संबंधित बातम्या :

ते दोघं पक्के जिगरी दोस्त, खारे फुटाणे विकायचे मग एकानं दुसऱ्याचा काटा का काढला? वाचा अकोल्याची क्राईम स्टोरी

एटीएसने मनसुख यांच्या वकिलाचा जबाब नोंदवला, के. एच, गिरींकडून वाझेंबाबत मोठे गौप्यस्फोट

अर्धवट जळालेली तरुणी, बाजूला कपड्यांची बॅग आणि सायकल, मृतदेहाजवळच्या चिठ्ठीने संशय वाढवला

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.