AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur : बिबट्याने महिलेच्या नरडीचा घेतला घोट, नागरिकांमध्ये दहशत

चंद्रपूरच्या दुर्गापूरमध्ये बिबट्याकडून आत्तापर्यंत अनेकदा हल्ले करण्यात आले आहेत. तशा तक्रारी देखील सध्या वास्तव करीत असलेल्या लोकांनी वनविभागाला दिल्या आहेत. काल महिला रात्री बाराच्या सुमारास काम करीत असताना अचानक बिबट्याने घरात प्रवेश केला.

Chandrapur : बिबट्याने महिलेच्या नरडीचा घेतला घोट, नागरिकांमध्ये दहशत
बिबट्याने महिलेल्या नरडीचा घेतला घोटImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 9:41 AM
Share

चंद्रपूर – चंद्रपूरच्या (Chandrapur) शहरालगत असलेल्या दुर्गापूरमध्ये (Durgapur) एक भयानक दुर्घटना घडली आहे. बिबट्याने (Leopard) घरात जाऊन घरकाम करीत असलेल्या महिलेच्या नरडीचा घोट घेतला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. त्या महिलेचे नाव गीता विठ्ठल मेश्राम असं आहे. ही घटना दुर्गापूरच्या वॉर्ड क्र. ३ मधील दिल्ली मोहल्ला येथे रात्री बारा वाजता घडली आहे. सदर भागात बिबट्याचे सातत्याने हल्ले होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. परंतु अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश आले आहे. वन विभागाचे अधिकारी आणि पोलिस (Chandrapur Police) घटनास्थळी दाखल झाले असून तपास करीत आहेत.

नेमकी काय आहे घटना

चंद्रपूरच्या दुर्गापूरमध्ये बिबट्याकडून आत्तापर्यंत अनेकदा हल्ले करण्यात आले आहेत. तशा तक्रारी देखील सध्या वास्तव करीत असलेल्या लोकांनी वनविभागाला दिल्या आहेत. काल महिला रात्री बाराच्या सुमारास काम करीत असताना अचानक बिबट्याने घरात प्रवेश केला. त्यावेळी थेट हल्ला केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिस आणि वनविभाग अधिकारी दाखल झाले असून तपास करीत आहेत. याच्या आगोदर त्याच परिसरात एक बिबट्या आणि एक वाघ वनविभागाने जेरबंद केला आहे. रात्रीच्यावेळेस हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

वाघ-बिबट्याची तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

दुर्गापूरमध्ये या परिसराला लागून वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणी आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रातून वन्यजीवांचा या परिसरात प्रवेश होत असल्याचे तेथील स्थानिक नागरिक सांगतात. परिसरात राहत असलेल्या लोकांनी वाघ-बिबट्याची तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.