Lalu Prasad Yadav : बिहार विधानसभा निवडणुकीआधी लालू प्रसाद यादवांसह त्यांच्या कुटुंबासाठी मोठा झटका
Lalu Prasad Yadav : पुढच्या महिन्यात बिहार विधानसभेची निवडणूक आहे. त्यासाठी उमेदवार निश्चित करण्याचं काम सुरु आहे. कालच NDA मध्ये कोण किती जागांवर लढणार ते स्पष्ट झालं. आता लालूप्रसाद यादव यांच्या राजदकडे लक्ष लागलेलं असताना त्यांना मोठा झटका बसला आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावर दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टने IRCTC प्रकरणात आरोप निश्चित केले आहेत. स्पेशल जज विशाल गोगने यांनी सर्व आरोपींच्या उपस्थितीत IRCTC प्रकरणात आरोप निश्चित केले. लालू प्रसाद यांचा सर्व टेंडरमध्ये हस्तक्षेप असायचा असं कोर्टाने म्हटलं. या संदर्भात पुरावे सुद्धा सादर केले. लालू यादव, राबडी आणि तेजस्वी यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले. बिहार विधानसभा निवडणुकीआधी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासाठी हा मोठा झटका आहे.
दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टाचे स्पेशल CBI जज विशाल गोगने यांनी IRCTC घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद, राबड़ी देवी आणि तेजस्वी यादवसह 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित केले. कोर्टाने लालू यांच्यावर IPC 420, IPC 120B प्रीवेंशन ऑफ करप्शन एक्टच्या कलम 13(2) आणि 13 (1)(d) अंतर्गत आरोप निश्चित केले. राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर 120 बी आणि 420 IPC अंतर्गत खटला चालेल. लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री पदावर होते, त्यामुळे प्रिवेंशन ऑफ करप्शनच्या कलमांखाली खटला चालेलं.
कोर्टात लालू प्रसाद यादव यांना उभं रहायला सांगितलं आणि…
कोर्टात लालू प्रसाद यादव यांना उभं रहायला सांगितलं आणि त्यांच्यावर असलेले आरोप सांगितलं. राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर प्रीवेंशन ऑफ करप्शन एक्ट नाही लागणार. कोर्टाने सर्वांवर आरोप निश्चित केले. कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना विचारलं की, तुम्ही तुमच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप स्वीकारता का? गिल्टी प्लीड करता का? की, खटल्याचा सामना करणार का?. लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
कोर्टाने काय मान्य केलं?
कोर्टाने म्हटलं की हे भ्रष्टाचाराच प्रकरण आहे. आरोपींच्या मतांशी ते सहमत नाहीत. सुनावणी दरम्यान CBI ने पुराव्यांची एक मालिका सादर केली. लालू प्रसाद यादव यांना माहित असताना हे घोटाळ्याच कारस्थान झालं हे कोर्टाने मान्य केलं. आरोपी व्यापक कटात सहभागी होता. यामुळे लालू कुटुंबाला फायदा झाला. राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना कमी किंमतीत जमीन मिळाली.
सीबीआयने कोर्टात काय म्हटलं?
आरोपींमध्ये IRCTC चे माजी ग्रुप जनरल मॅनेजर वीके अस्थाना, आर के गोयल, सुजाता हॉटल्सचे संचालक विजय कोचर आणि विनय कोचर सुद्धा आहेत. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान लालू प्रसाद यादव, राबड़ी देवी आणि तेजस्वी यादव यांनी सांगितलेलं की, त्यांच्याविरोधात CBI कडे पुरेसे पुरावे नाहीत. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. CBI ने 28 फेब्रुवारीला न्यायालयात सांगितलेलं की, त्यांच्याकडे आरोपींविरोध पुरेसे पुरावे आहेत.
