अज्ञात कारणातून तरुणाला हल्ला करुन संपवले, मात्र तपासात जे उघड झाले त्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला !

एका तरुणाची अज्ञात आरोपींनी हत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कसून तपास सुरु केला. अखेर आठवडाभरानंतर हत्येचा उलगडा करण्यास यश आले.

अज्ञात कारणातून तरुणाला हल्ला करुन संपवले, मात्र तपासात जे उघड झाले त्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला !
कौटुंबिक वादातून आईने मुलाला संपवलेImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 8:04 PM

धमतरी : मनोरुग्ण मुलगा आणि सुनेशी दररोज होणारा वाद याला कंटाळून आईनेच आपल्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. गणेश पटेल असे मयत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या हत्येचा सात दिवसात उलगडा करण्यास पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. फुलेश्वरी पटेल असे अटक महिलेचे नाव आहे. मदर्स डे च्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस तपासात हत्येचा उलगडा झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पोलीस पुढील तपास करत आहेत. घटना उघड होताच सर्वांना धक्काच बसला. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मुलगा लहानपणापासूनच मनोरुग्ण होता. त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडे इलाज सुरु होता.

सून माहेरी गेल्याची संधी साधत निर्दयी आईचे कृत्य

मदर्स डे च्या दिवशी गणेशची पत्नी नातेवाईकाच्या लग्नासाठी आपल्या माहेरी गेली होती. यामुळे घरी गणेश आणि त्याची आई फुलेश्वरी दोघेच होते. हीच संधी साधत दुसऱ्या दिवशी दुपारी फुलेश्वरीने मुलाचा काटा काढला. यानंतर पोलिसात जाऊन कुणीतरी आपल्या मुलाची हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पुढील तपास सुरु केला.

पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली

तपासादरम्यान सासू-सुनेचे दररोज भांडण होत असल्याचे पोलिसांना कळले. यानंतर पोलिसांनी फुलेश्वरीची चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलिसांनी फुलेश्वरीची कसून चौकशी केली असता, तिने सर्व घटना कथन केली. मुलाची मानसिक स्थिती खराब असल्याने त्याच्या उपचारासाठी पैसे लागत होते. तसेच सुनेसोबतही दररोज भांडण व्हायचे. या सर्वाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस चौकशीत कबूल केले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.