नागपुरात लॉकडाऊनमध्ये बालविवाह, चार दिवसांत दोन बालविवाह रोखण्यात यश

नागपुरात गेल्या चार दिवसात दोन बालविवाह रोखण्यात यश आलं आहे (Child Marriage). नागपूर जिल्ह्यात आणखी एक बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे.

नागपुरात लॉकडाऊनमध्ये बालविवाह, चार दिवसांत दोन बालविवाह रोखण्यात यश
नोंदणी आणि प्रत्यक्ष विवाहाचा दिवस यामध्ये 15 दिवसांचा कालावधी असतो. याच काळात विवाहोच्छूक जोडप्यांचे समूपदेशन करण्याची योजना गोवा सरकारने आखली आहे.

नागपूर : नागपुरात गेल्या चार दिवसात दोन बालविवाह रोखण्यात यश आलं आहे (Child Marriage). नागपूर जिल्ह्यात आणखी एक बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे. नागपूरजवळील नवी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत काल हा बालविवाह पार पडणार होता. मात्र, बाल सौरक्षण समिती आणि पोलिसांनी लग्न लागण्याच्या आधीच हा विवाह थांबविला (Child Marriage Stopped In Nagpur From Child Protection Committee And Police).

नागपूर जिल्ह्यातील कामठी पोलीस स्टेशन हद्दीत काल एक बालविवाह पार पडणार होता. यामध्ये वधू 17 वर्षाची तर वर 18 वर्षांचा होता. त्यांचा विवाह होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. लग्नाची सगळी तयारी करुन मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पाडण्याची योजना आखण्यात आली हाती. मात्र त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी मोडून काढला.

बाल सौरक्षण समिती आणि कामठी पोलिसांनी जिथे हा विवाह पार पडणार होता तिथे छापा टाकला आणि हा बालविवाह रोखला. नागपुरात बालविवाह होण्याचे हे काही पहिले प्रकरण नाही. चार दिवसांपूर्वी देखील याच प्रकारे पोलिसांनी आणखी एक बालविवाह रोखला होता.

चार दिवसांपूर्वीही एक बालविवाह रोखला

गेल्या 24 मे रोजी सुद्धा एक बालविवाह लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नागपुरातील बजाजनगर परिसरात एका 16 वर्षीय मुलीचा बालविवाह लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, यावेळीही जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईफने हा बालविवाह रोखला होता. यावेळी मुलीच्या जन्माचा दाखला मागितल्यावर हा बालविवाह होत असल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर मुलीचा बालविवाह न करण्याचं मुलीच्या आई-वडीलांकडून हमीपत्र घेण्यात आलं होतं.

Child Marriage Stopped In Nagpur From Child Protection Committee And Police

संबंधित बातम्या :

बालविवाह प्रतिबंध नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठित, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश

सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने बालविवाह रोकला, पोलिस दिसताच वऱ्हाडींनी पळ काढला