बालविवाह प्रतिबंध नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठित, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश

बालविवाह (प्रतिबंध) नियम 2008 मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

बालविवाह प्रतिबंध नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठित, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 11:38 PM

मुंबई :  बालविवाह (प्रतिबंध) नियम 2008 मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. यासंदर्भातील निर्देश महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीत दिले. (Committee formed to amend child marriage prevention rules yashomati Thackur)

बालविवाह (प्रतिबंध) नियमामध्ये सुधारणा करण्याबाबत आयोजित बैठकीस महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, उपायुक्त रवी पाटील, उपायुक्त तथा बालसंरक्षण कार्यक्रम व्यवस्थापक मनिषा बिरासीस, युनिसेफच्या बालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरा आदी उपस्थित होते.

बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालविवाह प्रतिबंध नियम 2008 ची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी नियमातील तरतुदींचा नव्याने आढावा घेत त्यातील त्रुटी काढण्यासह सुधारणा कराव्या लागतील. यासाठी ही समिती नेमण्यात नेमण्यात येत आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं.

समितीने नियमामध्ये आवश्यक त्या बदलांच्या अनुषंगाने अभ्यास करुन सुधारित नियमाचा मसुदा तातडीने शासनास सादर करावा, असे निर्देशही यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही 10 सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये रमा सरोद, डॉ.आशा बाजपेयी, डॉ.जया सागडे, ‘मासूम’च्या संस्था संचालक डॉ.मनिषा गुप्ते, विधायक भारतीचे संतोष शिंदे, सोशल बिहेवियर चेंज कम्युनिकेशनचे निशिध कुमार, युनिसेफच्या अल्पा वोरा, उपायुक्त (बालविकास) रवी पाटील, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी (बुलढाणा) दिवेश मराठे हे सदस्य आहेत.

(Committee formed to amend child marriage prevention rules yashomati Thackur)

संबंधित बातम्या

आधी अमित शाहांचा राजीनामा घ्या, मग माझ्याकडे मागा, यशोमती ठाकूर यांचा पलटवार

यशोमती ठाकूरांना मंत्रिमंडळाबाहेर काढल्यास काँग्रेस पाठिंबा काढेल, अशी ठाकरेंना भीती : चंद्रकांत पाटील

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.