AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईडमध्ये भाजपच्या माजी आमदाराचं नाव, सचिन सावंत यांचा गौप्यस्फोट

भाजपचे माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचा दावा सचिन सावंत यांनी केला (Sachin Sawant Mohan Delkar Suicide)

खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईडमध्ये भाजपच्या माजी आमदाराचं नाव, सचिन सावंत यांचा गौप्यस्फोट
आत्महत्या केलेले खासदार मोहन डेलकर आणि सचिन सावंत
| Updated on: Feb 24, 2021 | 2:59 PM
Share

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar Suicide) यांच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डेलकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिल जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या होत्या. भाजपचे माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव डेलकर यांनी आपल्या 16 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला. सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत तपास करण्याची मागणी केली. (Congress Leader Sachin Sawant claims former BJP MLA Prafull Patel name in MP Mohan Delkar Suicide Note)

“माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव”

स्थानिक भाजप नेत्यांकडून आपल्याला त्रास दिला जातोय, आपल्यावर खोट्या केसेस टाकल्या जात आहेत, अशा तक्रारी मोहन डेलकर यांनी यापूर्वी केल्या होत्या. भाजपचे माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव डेलकर यांनी आपल्या 16 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. भाजप नेते प्रफुल्ल पटेल सध्या दादरा नगर हवेलीत प्रशासक आहेत. डेलकरांवर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यांनी मुंबईत आत्महत्या केली, दादरा नगर हवेलीत आत्महत्या केली असती, तर मृत्यूनंतर त्यांना न्याय मिळाला नसता, असं त्यांना कदाचित वाटलं असेल, असा अंदाजही सचिन सावंत यांनी वर्तवला.

मोहन डेलकर यांची सुसाईड नोट

मरीन लाईन्स चौपाटी येथील सी ग्रीन हॉटेलमधील रूममध्ये मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी 15 पानांची सुसाईड नोट लिहिली असून, ही नोट खासदारांसाठी असलेल्या लेटरहेडवर लिहिली असल्याचं मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

केंद्रीय यंत्रणेकडून तपास

दरम्यान, मोहन डेलकर यांचा तात्काळ पोस्टमार्टम करण्यात आलाय. यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने तपासणी केली. डेलकर खासदार असल्याने केंद्रीय यंत्रणाही याचा तपास करीत आहे. कालच घटना घडली असल्याने आणि नातेवाईक डेलकर यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात व्यस्त होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. तसेच डेलकर मुंबईत आल्यावर त्यांच्यासोबत त्यांचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर होते. यांचाही अजून जबाब नोंदवण्यात आलेला नाही (Congress Leader Sachin Sawant claims former BJP MLA Prafull Patel name in MP Mohan Delkar Suicide Note)

कोण होते मोहन डेलकर?

58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.

संबंधित बातम्या  

खासदार मोहन डेलकर आत्महत्येचं गूढ वाढलं; सुसाईड नोटमध्ये काय?

तब्बल सातवेळा संसदेवर, खासदार मोहन डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

(Congress Leader Sachin Sawant claims former BJP MLA Prafull Patel name in MP Mohan Delkar Suicide Note)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.