लग्नाच्या मंडपात आचाऱ्याची हत्या, पोलिसांकडून दोन आरोपीना अटक

भर कार्यक्रमात अशा प्रकार खून झाल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपीना अटक केली आहे.

लग्नाच्या मंडपात आचाऱ्याची हत्या, पोलिसांकडून दोन आरोपीना अटक

नागपूर : नागपूरच्या (Nagpur) हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत एका लग्न समारंभात (Wedding) गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात कॅटर्सवाल्याने आचाऱ्याची हत्या (Cook Murder) केली आहे. पैश्याच्या वादावरून ही हत्या झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. भर कार्यक्रमात अशा प्रकार खून झाल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपीना अटक केली आहे. (cook murder in wedding two accused arrested by police in nagpur)

नागपूरच्या हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉन आहे. या ठिकाणी एक लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. लग्न समारंभ संपत असतानाच स्वयंपाक करणारा आचारी आणि केटरिंगचं काम करणारे यांच्यात पैशांवरून वाद झाला. वेगवेगळ्या ठिकाणी यांनी सोबत काम केलं होतं. त्या पैश्याचा यांचा हिशोब बाकी होता. काही वेळाने वाद एवढा वाढला की आरोपीने चाकूने आचाऱ्याची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश मिश्रा असं हत्या झालेल्या आचाऱ्याचं नाव आहे. या हत्येवेळी मृतक अखिलेश मिश्रा आणि त्याचा भाऊ दोघांवरही वार करण्यात आले. अखिलेश मिश्रा यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं. तर त्याचा भाऊ जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली.

खरंतर, नागपुरात हत्येच्या घटना व्हायला कारण लागत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणातील आरोपी आणि मृतक हे सोबत व्यवसाय करायचे मात्र शुल्लक कारणावरून ही हत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अखिशेल याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींचीही चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या – 

सांगलीत Modified Bike स्पर्धा पोलिसांनी उधळली, 37 ‘सौंदर्यवती’ ताब्यात

‘मर्डरला वर्ष पूर्ण, दुसर्‍या वादळाची तयारी’, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

विरारच्या शंभूनाथ मंदिरातील मूर्ती चोरट्यांनी पळवल्या, CCTVच्या आधारे 10 दिवसांतचं पोलिसांनी मुसक्या आवळल्या

(cook murder in wedding two accused arrested by police in nagpur)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI