कोव्हिड रुग्णालयातून डिस्चार्जची तयारी, मात्र कोरोना रुग्णाचा रुग्णालयातच गळफास

रामलिंग सानप (Ramling Sanap) असं आत्महत्या केलेल्या रुग्णाचं नाव आहे. ते बीड तालुक्यातील तांदळवाडी इथले रहिवासी होते

कोव्हिड रुग्णालयातून डिस्चार्जची तयारी, मात्र कोरोना रुग्णाचा रुग्णालयातच गळफास
Beed covid hospital
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 12:26 PM

बीड : कोव्हिड रुग्णालयात कोरोना बाधित (Corona positive) रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बीड शहरातील एका खासगी कोव्हिड रुग्णालयात (Beed corona update) ही धक्कादायक घटना घडली. रामलिंग सानप (Ramling Sanap) असं आत्महत्या केलेल्या रुग्णाचं नाव आहे. ते बीड तालुक्यातील तांदळवाडी इथले रहिवासी होते. (Corona positive patient commit suicide in private covid hospital Beed Maharashtra)

रामलिंग सानप मागील दहा दिवसांपासून दीप कोव्हिड रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच सानप यांनी आत्महत्या केली. रुग्णालयात झालेल्या या आत्महत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलं नसून बीड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

बीडमधील कोरोना सद्यस्थिती

दरम्यान बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 19 मे पर्यंत बीड जिल्ह्यातील कोरोना संक्रमित मृत्यू दर 1.99 टक्के इतका होता. तर रुग्णवाढीचा दरही मोठा होता.

बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण आजार अंगावर काढत आहेत. रुग्ण गंभीर झाल्यानंतर तो उपचारासाठी दाखल होतोय. त्यामुळे गंभीर रुग्णांचा मृत्यू होतोय. सध्या अँटीजन टेस्ट कमी आहेत. शिवाय लक्षणे दिसल्यावरही रुग्ण बाहेर फिरत आहेत. त्यातच रुग्णांच्यासोबत नातेवाईक असतात त्यामुळे काळजी घेतली नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे.

राज्याप्रमाणे बीड जिल्ह्यातही लसीचा तुटवडा आहे. पुढील आठवड्यात लसीकरण सुरळीत होईल अशी आशा आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.  दरम्यान, महाराष्ट्रात काल 20 मे रोजी दिवसभरात 29 हजार 911 नवे रुग्ण आढळले. तर 734 जणांचा मृत्यू झाला.

ठाण्यात 72 वर्षीय कोरोना रुग्णाची रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या  

अकोल्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची गळ्यावर ब्लेड फिरवून आत्महत्या, उपचारादरम्यान मृत्यू

(Corona positive patient commit suicide in private covid hospital Beed Maharashtra)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.