Crime | मेहुण्यानेच केला भावोजीवर गोळीबार, नालासोपाऱ्यात सैराटची पुनरावृत्ती, शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा

नोलासोपाऱ्यातून सैराट चित्रपटातील पटकथेची पुनरावृत्ती झाली आहे. पूर्व संतोष भुवन परिसरातील शर्मावाडीमध्ये राहणाऱ्या हितेन जोशी याने एका मुलीशी तिच्या घरच्यांविरोधात जाऊन लग्न केले होते. यावरून रविवारी, रात्री 10 वाजता गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. यात सख्या मेहुण्यानेच भावोजीवर दोन गोळ्या फायर केल्या. या घटनेत भावोजी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Crime | मेहुण्यानेच केला भावोजीवर गोळीबार, नालासोपाऱ्यात सैराटची पुनरावृत्ती, शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा
वार्ड प्रमुखाला अनेक महिने ओलीस ठेवल्याचा आमदारावर आरोप.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 2:16 PM

नालासोपारा : नालासोपाऱ्यात (Nalasopara) गोळीबाराचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. नालासोपारा परिसरात पुन्हा गोळीबाराची एक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नालासोपारा (Nalasopara) पूर्व संतोष भुवन परिसरात रविवारी, रात्री 10 वाजता गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. यात सख्या मेहुण्यानेच भावोजीवर दोन गोळ्या फायर केल्याची घटना घडली आहे. यामध्ये भावोजी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कौटुंबिक वादातून गोळीबार

नालासोपाऱ्याच्या पूर्व संतोष भुवन परिसरात झालेल्या गोळीबारात हितेन जोशी, हा जखमी असून, दीपक गौतम असे आरोपीचे नाव आहे. जखमी आणि आरोपी यांचे मेहुणे-भावोजीचे नाते आहे. कौटुंबिक वादविवादाच्या कारणातून मेहुण्याने भावोजीवर दोन गोळ्या फायर केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. नालासोपारा पूर्व संतोष भुवन शर्मावाडी या परिसरात रविवारी, रात्री 10च्या सुमारास दोघांनी पायी चालत येऊन फायरिंग केली. यानंतर ते लगेच फरार झाले.

गोळीबारातून सैराटची पुनरावृत्ती

नोलासोपाऱ्यातून सैराट चित्रपटातील पटकथेची पुनरावृत्ती झाल्याची प्रचिती येते. पूर्व संतोष भुवन परिसरातील शर्मावाडीमध्ये राहणाऱ्या हितेन जोशी याने एका मुलीशी तिच्या घरच्यांविरोधात जाऊन लग्न केले होते. यावरून मुलीच्या घरच्या मंडळींनी त्याला धमकावले. आठ महिन्यांपूर्वी मुलीचा भाऊ दीपक गौतम याने हितेनला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती. यावेळी हितेन याने पोलिसात तक्रार दिली होती. यानंतर दीपकने हितेनचा काटा काढण्याचा कट रचला. रविवारी, रात्री 10 वाजता दीपकने संधी साधत बंदुकीतून दोन गोळ्या झाडून हितेनची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण, हितेन यातून वाचला असून त्याच्यावर उपाचार सुरु आहेत.

इतर बातम्या

Pune Crime : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका

युद्धाच्या काळात हे चित्र आशादायी; IND-PAK महिला क्रिकेटपटूंच्या त्या VIDEO चं मोहम्मद कैफकडून कौतुक

Russia Ukraine War Live : युक्रेनमध्ये अडकलेल्या 160 भारतीयांना घेऊन आणखी एक विमान दिल्लीत दाखल

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.