Madhya Pradesh : चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, पोलिसांनी आत्येभावाला केली अटक, काय आहे नेमकं प्रकरण?

Madhya Pradesh : चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, पोलिसांनी आत्येभावाला केली अटक, काय आहे नेमकं प्रकरण?
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: टीव्ही9

मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अधिक माहितीनुसार घटनेच्या चार दिवस आधी चिमुकली तिच्या आत्याच्या घरी आली होती. त्यानंतर रात्री ही मुलगी अचानक बेपत्ता झाली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 20, 2022 | 11:43 AM

मध्य प्रदेशमधून (Madhya pradesh)  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार (Rape) करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अधिक माहितीनुसार घटनेच्या चार दिवस आधी चिमुकली (girl) तिच्या आत्याच्या घरी आली होती. त्यानंतर रात्री ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. सणासाठी आलेली चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याने नातवाईकांनी आक्रोश केला. मुलीला परिसरात चहुकडे सापडलं मात्र ती कुठेही सापडून आली नाही.  चिमुकलीच्या आत्यासह तिच्या नातेवाईकांनी बराच वेळ चिमुकलीचा शोध घेतला असता एका ठिकाणी मुलीचा मृतदेह पडलेला आढळून आला. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात प्रचंड चणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण प्रकरणाची नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरु केला आहे. दरम्यान, घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

बापाला कळताच गाठले मंदसौर

या संपूर्ण प्रकरणाची नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरु केला आहे.  मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांची मुलगी होळीनिमित्त आत्याच्या घरी आली होती. त्यानंतर त्यांना फोन आला. यावेळी मुलीच्या वडिलांनी चिमुकलीची विचारपूस केली. यावर चिमुकलीच्या आत्याने मुलीची हत्या झाल्याचे सांगतिले. यामुळे मुलीच्या वडिलांनी तात्काळ राजस्थानमधून निघून मध्य प्रदेशातील मंदसौर गाठले. यावेळी सणासाठी आलेल्या त्यांच्या चिमुकलीचा मृतदेह त्यांना पहावा लागला.

आत्याचा मुलगा अटकेत

घटनेची संपूर्ण माहिती देताना यशोधर्मन नगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक लक्ष्मी सिसोदिया यांनी सांगितलं की, मुलीच्या मृतदेह सापडला आहे. शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून याप्रकरणी तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी मुलीवर बलात्काराचा गुन्हा आहे आणि तिचा मृत्यू गळा दाबल्याने झालाय.  यानंतर पोलिसांनी अधिक तपास करुन आत्याच्या मुलाला अटक केली आहे. आत्याच्या मुलानेच चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आत्येभाऊ ठरला नराधम

राजस्थानमधून चार वर्षांची चिमुकली होळीनिमित्त मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आत्याच्या घरी आली होती. पण, याच होळीमध्ये या चिमुलीवर आत्येभावाने बलात्कार केला. या नराधम आत्येभावाने त्यानंतर चिमुकलीची हत्या केली.  नात्याला काळीमा फासणारी ही घटना राज्यात वाऱ्यासारखी पसरली. होळीनिमित्त लेकीला बहिणीच्या घरी पाठवलं. पण त्या बापाला लेकीचा मृतदेह पाहावा लागला. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.

इतर बातम्या

आज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदार, जिल्हाप्रमुखांशी संवाद साधणार

Nagpur Crime | पारडीत रात्री फुटपाथवर झोपण्यावर मजुरांचा वाद, गट्टूने डोक्यावर वार करत एकाची हत्या

…तर पंजाब किंग्स IPL 2022 चा चॅम्पियन बनेल, कप्तान मयंक अग्रवालचा सहकाऱ्यांना कानमंत्र

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें