मुंबईत सेक्सटॉर्शनचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त, सामान्यांपासून बॉलिवूडचे 100 सेलिब्रिटीज अडकल्याचा अंदाज

या टोळीमध्ये दोन आरोपी व्यवसायाने अभियंता आहेत, तर एक अल्पवयीन आरोपी देखील सामील आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, 12 बनावट खाती, 6 बनावट ईमेल आयडी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.

मुंबईत सेक्सटॉर्शनचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त, सामान्यांपासून बॉलिवूडचे 100 सेलिब्रिटीज अडकल्याचा अंदाज
मुंबई पोलिसांकडून चार आरोपींना अटक
गोविंद ठाकूर

| Edited By: अनिश बेंद्रे

Aug 19, 2021 | 9:17 AM

मुंबई : गुन्हेगारी जगतात तुम्ही खंडणी वसुलीचे प्रकार अनेक वेळा ऐकले असतील. पण यावेळी मुंबई पोलिसांनी एक असे रॅकेट पकडले आहे, ज्याची व्याप्ती अत्यंत मोठी आहे. सामान्य माणसापासून बॉलिवूडचे जवळपास 100 सेलिब्रिटीज यात अडकले आहेत. मुंबई पोलिसांनी सेक्सटॉर्शन प्रकरणात नागपूर, ओदिशा, गुजरात, कोलकाता येथून चार आरोपींना अटक केली आहे, त्यापैकी 2 आरोपी व्यवसायाने अभियंते आहेत, तर एका अल्पवयीन आरोपीचाही यात समावेश आहे.

वेगवेगळ्या राज्यात 258 जणांची फसवणूक

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांसमोर सेक्स्टॉरशनची प्रकरणे समोर येत होती. कारवाई करताना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एका टोळीला पकडले आहे, ज्याने वेगवेगळ्या राज्यांतील 258 जणांना त्याचा बळी बनवले आहे. या टोळीमध्ये दोन आरोपी व्यवसायाने अभियंता आहेत, तर एक अल्पवयीन आरोपी देखील सामील आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, 12 बनावट खाती, 6 बनावट ईमेल आयडी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.

पीडितांकडून लाखो रुपये उकळले

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ज्या टोळीचा भांडाफोड केला आहे, त्याने आतापर्यंत सुमारे 258 जणांची फसवणूक केली आहे, त्यापैकी बॉलिवूडमध्ये A श्रेणीमध्ये येणारे सुमारे 100 जण आहेत. याशिवाय टीव्ही इंडस्ट्रीशी निगडीत असलेले अनेक अभिनेते आणि अभिनेत्री देखील या सेक्स्टॉरेशन रॅकेटचे बळी ठरले आहेत. या व्हिडीओच्या बदल्यात हे रॅकेट या सेलिब्रिटीज आणि पीडितांकडून लाखो रुपये घेत असत. या व्हिडिओंचे ग्रॅब्स नंतर ट्विटर, डार्कनेट आणि टेलिग्राम यासारख्या सोशल मीडिया अॅप्लिकेशनवर इतर लोकांना मोठ्या पैशांना विकले गेले.

काय आहे मोडस ऑपरेंडी

सेक्स्टॉरेशनमध्ये एखाद्या व्यक्तीशी सोशल मीडियाद्वारे (स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम) पहिल्यांदा मैत्री केली जाते. मग 6 महिने किंवा त्याहून अधिक काळानंतर ती व्यक्ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवली जाते. मग एखाद्या दिवशी व्हिडिओ कॉलवर त्या व्यक्तीला नग्न होण्यास सांगितले जाते. त्याचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो. यानंतर ब्लॅकमेलिंग सुरू होते. सार्वजनिक व्यासपीठावर हे नग्न व्हिडिओ अपलोड न करण्याच्या अटीवर सेलिब्रिटी किंवा त्या व्यक्तीकडून मोठी रक्कम गोळा केली जाते.

नेपाळच्या बँक खात्यातून व्यवहार

सायबर सेलला त्याच्या तपासात कळले की या आरोपींनी तपास यंत्रणांना टाळण्यासाठी नेपाळच्या बँक खात्यातील पैशांच्या व्यवहारांसाठी वापर केला आहे. या लोकांना भीती वाटली की जर हे प्रकरण समोर आले तर त्यांचे खाते गोठवले जाईल. सायबर सेलने आता नेपाळ प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली आहे आणि बँक खात्याशी संबंधित तपशील मागितला आहे जेणेकरून प्रकरण गाठता येईल.

संबंधित बातम्या :

तुम्हाला पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल तर नाही येत? सावधान, मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !

सावधान! तुमच्याभोवतीही सेक्सटॉर्शनचं जाळं, नव्या सायबर क्राईमचं पोलिसांसमोर चॅलेंज

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें