AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टेशनवरील बॅगेत मृतदेह, नव्या ट्विस्टने खळबळ.. मृताच्या पत्नीचाही हत्येत सहभाग; अनैतिक संबंधांमुळे…

दादर रेल्वे स्थानकातीलल एका प्रवाशाच्या बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. याप्रकरणी दोन मूकबधीर तरूणांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात एका नवा ट्विस्ट आला असून मृताच्या पत्नीचाही त्याच्या हत्याकांडात समावेश असल्याचे उघड झाले आहे. तिचे आरोपीसह विवाहबाह्य संबंध होते अशी माहिती समोर आली आहे.

स्टेशनवरील बॅगेत मृतदेह, नव्या ट्विस्टने खळबळ.. मृताच्या पत्नीचाही हत्येत सहभाग;  अनैतिक संबंधांमुळे...
| Updated on: Aug 08, 2024 | 10:25 AM
Share

मुंबईतील दादर स्थानकावर नेहमीच गर्दी असते. मात्र या आठवड्याच्या सुरूवातीला दादर स्टेशनवरील एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचालीकडे पोलिसांचं लक्ष गेलं आणि एक मोठा गुन्हा उघडकीस आला. संशय आल्याने पोलिसांनी त्या मूकबधिर तरूणाला रोखून त्याची बॅग तपासली असता त्यामध्ये रक्ताने माखलेला मृतदेह आढळला आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. अवघ्या चार तासांच्या आत पोलिसांनी याप्रकरणाची उकल करत हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक केली. मात्र आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला असून मृताच्या हत्येत त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याचं उघड झालंय.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्शद अली सादीक अली शेख (वय 30) असे मृताचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी मृतदेह घेऊन जाणारा जय प्रवीण चावडा याला व त्याचा साथीदार शिवजीत कुमार सिंह या दोघांनाही अटक केली. त्यांच्या चौकशीत बरीच माहिती पोलिसांना मिळाली आणि या हत्याकांडात एक ट्विस्टही आला.

पत्नीचाही हत्येत सहभाग

पायधुनी येथे जय चावडा आणि शिवजीत या दोघांनी अर्शदची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो बॅगेत कोंबून ते एक्स्प्रेसमध्ये चढणार होते. मात्र दादर स्टेशनवर पोलिसांनी त्यांना हटकले आणि खून उघडकीस आला. मात्र चौकशी दरम्यान एक धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. अशर्द याच्या हत्येमध्ये त्याची पत्नी रूक्सानाचाही सहभाग होता. हत्या करणारे आरोपी आणि मृतक तिघेही मूकबधीर असून अर्शद शेखची पत्नीही दिव्यांग आहे.

दोन्ही मूकबधील तरूणांनी कट रचून अर्शदचा काटा काढला. या कटामध्ये अर्शद याची पत्नी रूक्सना हिचाही सहभाग आढळला असून पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात तिला अटक केली आहे. मृताची पत्नी रुक्साना हिचे तिच्या पतीचा मित्र आणि या हत्येतील आरोपी जय चावडा याच्याशी विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातूनच हे हत्याकांड घडलं.

दारू पिण्यासाठी नेलं आणि काटा काढला

मृत अर्शद आणि आरोपी जय चावडा हे मित्र होते. मात्र त्याच जयचे अर्शदच्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे अर्शदचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. त्यामुळे जयने अर्शदला दारू पिण्यासाठी पायधुनी येथे बोलावले आणि तेथे मित्र शिवजीत सिंग याच्या मदतीने अर्शदची निर्घृण हत्या केली. हातोड्याने वार करून त्याला क्रूरपणे ठार मारले. त्यानंतर अर्शदचा मृतदेह बॅगेत भरून तुतारी एक्सप्रेसने ते पळून जाणार होते. मात्र त्यावेळी जय याला दादर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी पकडले. चौकशीत त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुसरा आरोपी शिवजीत याला उल्हासनगर येथून अटक केली. मृताच्या पत्नीचाही या कटात सहभाग होता.

ही हत्या शिवजीत याने केल्याचे भासविण्यासाठी जय याने हत्या करताना त्याचे चित्रिकरण केले होते. याचवेळी बेल्जियम येथील एका व्यक्तीला व्हीडीओ कॅालही करण्यात आला होता. या हत्या प्रकरणात बेलजियमधील त्या तरुणाचा काही सहभाग आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत. हत्येचा व्हिडिओ मूकबधिर लोकांच्या गृपवरही शेअर करण्यात आला त्यामुळे अनेकांना हत्येची माहिती होती असेही समोर आलंय. आरोपीने फक्त अनैतिक संबंधाच्या भांडणावरून ही हत्या केली की आणखी काही कारणे आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.