AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात मृतदेह माझ्याशी बोलतोय… तरूण पोलिसांकडे पोहोचला; त्या जंगलात काय घडलं?

आपल्या स्वप्नात एक मृतदेह आला आणि तो बोलू लागला ... एका तरूणाच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रातील खेडमध्ये मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा, कवटी सापडली आणि पोलिसही चक्रावले.

स्वप्नात मृतदेह माझ्याशी बोलतोय... तरूण पोलिसांकडे पोहोचला; त्या जंगलात काय घडलं?
नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
| Updated on: Sep 21, 2024 | 1:35 PM
Share

आपल्या स्वप्नात एक मृतदेह आला आणि तो बोलू लागला … एका तरूणाच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रातील खेडमध्ये मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा, कवटी सापडली आणि पोलिसही चक्रावले. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. कारण मृतदेह दिसला, तो बोलतोय असा दावा केलेल्या तरूणाचे ते स्वप्न म्हणजे चक्क बनाव असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी योगेश आर्या (वय 30, रा, सिंधुदुर्ग) याला खेड पोलिसांनी अटक केली आहे. ज्याचा मृतदेह सापडला ती व्यक्ती आणि योगेश यांचा नेमका संबंध काय,हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून योगेशच्या चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासा होईल आणि या मृत्यूचे गूढ संपूर्ण उकलेल अशी अपेक्षा आहे.

नेमकं काय झालं ?

सिंधुदुर्गातील सावंतवाडीत राहणाऱ्या योगेश या तरुणाला दोन दिवसांपूर्वी ( 17 सप्टेंबर) स्वप्नात एक मृतदेह दिसला होता. माझ्या स्वप्नात एक मृतदेह आलाय, तो माझ्याशी बोलतोय असा त्याचा दावा होता. त्यानंतर योगेशने खेड पोलीस स्टेशन गाठलं. ‘ खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचा मृतदेह आहे. तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा, असे सांगत आहे’ असे योगेशने पोलिसांना सांगितलं. त्याचं बोलणं ऐकून पोलिस चक्रावले, सुरूवातील कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पण तो त्याच्या बोलण्यावर ठाम होता. अखेर पोलिसांनी तेथे जाऊन त्या भागाची पाहणी केली

त्यावेळी भोस्ते घाटातील जंगलात एका झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी जवळ तपासले असता, एका आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्ट्या बांधून त्याला टॉवेलने गळफास घेतलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह खाली पडलेला दिसला. राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट अशा कपड्यांच्या आत मानवी हाडे असल्याचे दिसून आले. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची एक सॅक होती, तसेच काही अंतरावर एक कवटीही पडलेली दिसली. मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ काळ्या रंगाचे बूट होते.

मृतदेहाची अवस्था पाहून ही घटना खूप दिवसांपूर्वी घडली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र तेथे सापडलेल्या सॅकमध्ये कोणतेही पुरावे नव्हते, ओळखपत्रही नव्हते, त्यामुळे हा मृतदेह कोणाचा , ही आत्महत्या आहे की घातपात याचा पोलिस तपास करत होते. स्थानिकांपैकी कोणालाही या मृतदेहाबद्दल काही कळू नये, पण एका इसमाच्या स्वप्नात मृतदेह यावा, तो आपल्याशी बोलला, असा दावाा तरूणाने करावा,हे पोलिसांना संशयास्पद वाटलं.

त्यांनी त्यादृष्टीनेही तपास केला. स्वप्न खरं ठरला असा दावा करण्यात आल्याने पोलिसांची झोप उडाली होती. मात्र अथक तपासानंतर हे स्वप्न वगैरे बनाव असल्याचे उघड झाले. सिंधुदुर्गात राहणाऱ्या माणसाला खेडमधल्या डोंगरातला मृतदेह स्वप्नात कसा दिसतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खेड मधील या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक गोव्यामध्ये देखील रवाना झाले आहे. त्यानंतर योगेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू होती . अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले व आज अटक करण्यात आली. योगशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडीओ शेअर केले होते, त्यावरून पोलिसांना संशय आला. अखेर खेड पोलिसांनी तपास करून, योगेशला अटक केली. मृत व्यक्ती आणि योगेश यांचा नेमका संबंध काय हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. पुढील तपासानंतरच या खुनाला वाचा फुटेल.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.