28 वर्षीय महिलेवर शेजाऱ्याचा चाकू हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

28 वर्षीय महिलेवर शेजाऱ्याचा चाकू हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
दिल्लीत तरुणीवर चाकूहल्ला

दिल्लीतील रोहिणी सेक्टर 11 मध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Delhi lady stabbed by Neighbor)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 04, 2021 | 2:25 PM

नवी दिल्ली : भरदिवसा चाकू भोसकून तरुणाची हत्या झाल्याची दिल्लीतील घटना ताजी असतानाच शहरात महिलेवरही चाकू हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेजाऱ्यानेच या महिलेला घराजवळ बोलावून हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून आरोपी शेजाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Delhi 28 years old lady stabbed by Neighbor at Rohini area)

गंभीर जखमी महिलेवर उपचार सुरु

दिल्लीतील रोहिणी सेक्टर 11 मध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 28 वर्षीय महिलेवर तिच्याच शेजाऱ्याने चाकू हल्ला केला. अनेक वेळा वार झाल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास शाहाबाद डेअरी पोलीस ठाण्याला याविषयी माहिती मिळाली होती.

आरोपी शेजाऱ्याला अटक

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. आरोपीचे नाव नरेश उर्फ राजू आहे. त्याने महिलेला फोन करुन घराबाहेर बोलावले होते. त्यावेळी भररस्त्यातच त्याने तिच्यावर चाकूने वार केले. पीडितेच्या नाकेवाईकांच्या माहितीनुसार आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दिल्लीत तरुणावर चाकू हल्ला

दरम्यान, वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची घटना राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारीच घडली होती. 19 वर्षीय तरुणावर चौघांनी भर रस्त्यात हल्ला केला होता. जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एकाच तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मयत तरुणामध्ये वाद होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या :

एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय तरुणीची हत्या, कुटुंबीय नसताना घरात घुसून चाकूहल्ला

VIDEO : वडिलांसाठी बर्थडे केक आणायला गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या

(Delhi 28 years old lady stabbed by Neighbor at Rohini area)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें