वीजबिलाच्या पैशांवरून वाद, घरमालकाने केली भाडेकरूची हत्या; पत्नीवरही केला प्राणघातक हल्ला

दिल्लीच्या मयूर विहार परिसरामधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. वीजबिलाचे पैसे न दिल्याने घरमालकाने चक्क आपल्या भाडेकरूची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

वीजबिलाच्या पैशांवरून वाद, घरमालकाने केली भाडेकरूची हत्या; पत्नीवरही केला प्राणघातक हल्ला
मिठाईच्या दुकानातील उकळत्या पाण्यात पडली चिमुकली
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 18, 2021 | 10:03 AM

नवी दिल्ली : दिल्लीच्या मयूर विहार परिसरामधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. वीजबिलाचे पैसे न दिल्याने घरमालकाने चक्क आपल्या भाडेकरूची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वीजबिलाच्या पैशांवरून घरमालक आणि भाडेकरूमध्ये वाद झाला. राग अनावर झाल्याने घरमालकाने संबंधित व्यक्तीवर चाकून हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भाडेकरूचा मृत्यू झाला आहे. घरमालकाने भाडेकरूच्या पत्नीला देखील मारहाण केली आहे. दरम्यान घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. भाडेकरू आणि त्याच्या पत्नीला स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले, तर त्याच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत.

आधीही झाला होता वाद

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मृत काले खान हे आपल्या कुटुंबासोबत दिल्लीमधील मयूर विहार परिसरामध्ये राहात होते. त्यांनी आरोपी मुर्गन याच्याकडून या ठिकाणी रूम भाड्याने घेतली होती. काले खान हे आपली पत्नी आणि तीन मुलांसोबत या खोलीमध्ये राहात होते. गुरुवारी रात्री ते आपल्या घरासमोर थंडीपासून बचावासाठी शेकत बसले असता, आरोपी मुर्गन त्या ठिकाणी आला व त्याने काले खान यांच्याकडे वीजबिलाच्या पैशांची मागणी केली. यावरून त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला. त्याने काले खान यांच्या पत्नीला देखील मारहाण केली. काले खान यांच्या पत्नीने देखील आरोपीच्या कानाखाली लगावली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला.

राग अनावर झाल्याने हल्ला

दरम्यान त्यानंतर आरोपी पुन्हा आपला मुलगा आणि मित्रासह घटनास्थळी आला. भांडणाचा राग अनावरण झाल्याने त्याने काले खान यांच्यावर चाकून वार केले, तर त्यांच्या पत्नीच्या डोक्यात देखील एका जड वस्तूने प्रहार केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत काले खान यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांच्या पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें