पापाचा घडा भरला, राजस्थानातून मुंबईत 21 कोटींच्या हिरॉईनची स्मगलिंग, मुंबईतील टॉप ड्रग्ज पेडलर महिला अखेर जायबंद

अटकेतील संबंधित महिला ही मुंबईतील टॉप ड्रग्ज पेडलर्सपैकी एक आहे. एक मोठं रॅकेट समोर आलं असून, संबंधित महिला 10 वर्षांपासून या धंद्यात आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या युनिट 7नेही कारवाई केलीय. आतापर्यंत 8 नवीन प्रकरणं समोर आली असून, त्यामध्ये 16 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलेय, त्यापैकी तीन जणांना राजस्थानमधून अटक करण्यात आलीय.

पापाचा घडा भरला, राजस्थानातून मुंबईत 21 कोटींच्या हिरॉईनची स्मगलिंग, मुंबईतील टॉप ड्रग्ज पेडलर महिला अखेर जायबंद
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 6:49 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरण चर्चेत आहे. त्यानंतर एनसीबीनं मुंबईतल्या अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. तसेच एनसीबीच्या या धाडींमध्ये बराच मुद्देमाल जप्त केलाय. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज सप्लायर्सच्या विरोधात एक विशेष मोहीम चालवली जात आहे, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सप्लायर्सवर नजर ठेवली जात आहे. एका महिलेकडून 7 किलो हेरॅाईन जप्त करण्यात आले असून, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत अंदाजे 21 कोटी रुपये आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलीय.

संबंधित महिला ही मुंबईतील टॉप ड्रग्ज पेडलर्सपैकी एक

अटकेतील संबंधित महिला ही मुंबईतील टॉप ड्रग्ज पेडलर्सपैकी एक आहे. एक मोठं रॅकेट समोर आलं असून, संबंधित महिला 10 वर्षांपासून या धंद्यात आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या युनिट 7नेही कारवाई केलीय. आतापर्यंत 8 नवीन प्रकरणं समोर आली असून, त्यामध्ये 16 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलेय, त्यापैकी तीन जणांना राजस्थानमधून अटक करण्यात आलीय.

राजस्थान ते मुंबई अशी ही एक पुरवठा साखळी सुरू

राजस्थान ते मुंबई अशी ही एक पुरवठा साखळी सुरू होती. ह्युमन कुरिअर्सचा वापर करत मुंबईत ड्रग्जचा हा प्रवास केला जात होता. या तपासात आम्हाला काही नावं कळाली आहेत, ज्यांची नावं आम्ही लवकरच उघड करणार असल्याचं क्राईम ब्रँचच्या युनिट 7ने सांगितलंय. आतापर्यंत दोन व्यक्तींना अटक केली असून, अजून तपास सुरू आहे.

आर्यन खानची मुंबई हायकोर्टात धाव

मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी हाय कोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केलाय. विशेष एनडीपीएस सेशन्स कोर्टाच्या निकालाला आर्यनच्या वकिलांमार्फत हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. आर्यन खानच्या वतीनं जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय. मात्र, न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्याकडून आजचं कामकाज बरखास्त करण्यात आल्यानं आर्यन खानला आजची रात्र तुरुंगात राहावं लागणार आहे. इतर बातम्या:

आर्यन खानची केस फेक, मुंबईत दहशत माजवण्याचा-खंडणीचा धंदा सुरुय, सर्वांचे पुरावे देणार : नवाब मलिक

Aryan Khan Drugs Case | शाहरुखला पुन्हा झटका, ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.