AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अटक करायला गेले पण घडलं भलतंच, नेत्यानेच टाकली ईडी अधिकाऱ्यांवर केस…

ईडीचे अधिकारी माझ्याविरुद्ध पुरावे तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून मी दोषी सिद्ध व्हावे. माझ्यावर असे आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यामध्ये सात वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद आहे असे या नेत्यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.

अटक करायला गेले पण घडलं भलतंच, नेत्यानेच टाकली ईडी अधिकाऱ्यांवर केस...
ED OFFICER Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 31, 2024 | 8:08 PM
Share

झारखंड | 31 जानेवारी 2024 : ईडीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक छळ सहन करावा लागला आहे. आम्हाला त्रास देणारे यापैकी कोणीही एससी किंवा एसटी समाजातील नाही. त्यामुळे ईडीच्या चार नावाजलेल्या अधिकाऱ्याविरोधात तसेच अज्ञात अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवावा. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एसटी-एससी पोलिस स्टेशनच्या प्रभारी निरीक्षकांना पाठवली आहे. मुख्यमंत्री यांच्या या पत्राची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हाही नोंदविला आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजधानी रांचीच्या एसटी – एससी पोलिस ठाण्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला. यामध्ये रांची झोनल ऑफिसच्या चार अधिकाऱ्यांची नावे आहेत. कपिल राज, देवव्रत झा, अनुपम कुमार आणि अमन पटेल या चार अधिकाऱ्यांसह काही अज्ञात अधिकाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

हेमंत सोरेन यांनी बुधवारी 31 जानेवारी रोजी एसटी-एससी पोलिस स्टेशनला पाठवलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 30 जानेवारीला जेव्हा रांचीला पोहोचले तेव्हा काही इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियावरून कळले की काही ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना आणि त्याच्या समाजाला त्रास देण्यासाठी, त्यांच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी नवी दिल्लीतील झारखंड भवन आणि 5/01, शांती निकेतन येथील निवासस्थानी छापे टाकले.

27 आणि 28 जानेवारीला नवी दिल्लीला गेले होते. यावेळी ते त्यांच्या ५/१ शांती निकेतन येथील शासकीय निवासस्थानी राहिले. 29 जानेवारी रोजी वरील अधिकाऱ्यांसह इतर काही अधिकाऱ्यांनी माझ्या निवासस्थानी पोहोचून झडती घेतल्याचे त्यांना समजले. याबाबत मला माहिती देण्यात आली नाही. हेमंत सोरेन यांनी पुढे असे म्हटले आहे की, याच अधिकाऱ्यांनी मला सांगितले होते की त्यांना 29 ते 31 जानेवारी दरम्यान रांचीमध्ये माझी चौकशी करायची आहे.

झारखंडमधील राष्ट्रीय, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेल्या बातम्यांची माहिती याच अधिकाऱ्यांनी दिली असावी. माझ्या समजुतीनुसार सर्वसामान्यांच्या नजरेत माझी बदनामी करणे हाच त्यांचा उद्देश आहे. एवढेच नाही तर 30 जानेवारीला मला मीडिया रिपोर्ट्सवरून कळले की याच लोकांनी माझ्या दिल्लीतील निवासस्थानातून निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार जप्त केल्याची खोटी बातमी पसरवली होती. तसेच, रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचेही सांगितले, असा आरोप हेमंत सोरेन यांनी केला आहे.

ईडी ज्या बीएमडब्ल्यू कारबद्दल बोलत आहे ती निळी कार माझी नाही असे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्पष्ट केलं आहे. माझ्याकडे कोणताही अवैध पैसा नाही. वरील चार लोकांसह काही अज्ञात लोकांनी जे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे नाहीत त्यांनी माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हे केले आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीचे सदस्य आणि साहिबगंज विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून या ईडी अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या या लेखी तक्रारीनंतर एसटी-एससी पोलिस ठाण्यात एससी/एसटी (पीए) कायद्यान्वये गुन्हा (क्रमांक 6/24) नोंदवण्यात आला. गोंडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक कुमार राय यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.