एकनाथ खडसेंची साडे सहातास चौकशी; तपासानंतर दिली ‘ही’ प्रतिक्रिया

एकनाथ खडसेंची साडे सहातास चौकशी; तपासानंतर दिली 'ही' प्रतिक्रिया

पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली. (eknath khadse Grilled By ED For 6 Hours In bhosari land Probe)

भीमराव गवळी

| Edited By: Namrata Patil

Jan 15, 2021 | 8:30 PM

मुंबई: पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची आज ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली. ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. ईडीला जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा तेव्हा त्यांना सर्व सहकार्य करण्यात येईल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. (eknath khadse Grilled By ED For 6 Hours In bhosari land Probe)

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज सकाळीच ईडीच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांची साडे सहातास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्या कन्येचीही चौकशी करण्यात आली. या चौकशी नंतर संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारे खडसे ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी मीडियाने त्यांना गराडा घातला असता खडसे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी मला जेव्हा जेव्हा कागदपत्रं आणि इतर माहितीसाठी बोलावेल तेव्हा तेव्हा मी हजर राहीन. ईडीला सर्व सहकार्य करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, आजच्या चौकशीत काय काय विचारणा करण्यात आली, हे सांगणं त्यांनी टाळलं.

कोणताही दबाव नाही

ईडीने नोटीस बजावली होती. त्यामुळे मी हजर राहिलो. यापूर्वी दोनवेळा भोसरी जमीन प्रकरणी चार वेळा चौकशी झाली आहे. आता ईडीकडून पाचव्यांदा चौकशी केली जात आहे. अँटिकरप्शन ब्युर, आयकर विभाग आणि जोटिगं कमिटीने सखोल चौकशी केली आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत, असं सांगतानाच ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव आलेला नाही. त्यांनी पुन्हा बोलावलेलंही नाही, असं खडसे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे खरेदी केलेल्या जमिनीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद सोडावे लागले होते. नंतरच्या काळात एकनाथ खडसे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे गेले होते. मात्र, या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. हा 40 कोटींचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असल्याचं सांगितलं जातं. हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी असल्याचं सांगतिलं जातं.

काय म्हणाले होते खडसे?

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते. (eknath khadse Grilled By ED For 6 Hours In bhosari land Probe)

संबंधित बातम्या:

भोसरी भूखंड प्रकरणात नोटीस, 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहणार, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ खडसे यांना कोरोना, खासगी चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह

भोसरी भूखंड प्रकरणी खडसेंची ईडी चौकशी, तारीख आणि वेळ ठरली

(eknath khadse Grilled By ED For 6 Hours In bhosari land Probe)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें