सासऱ्याने लाज आणली, सुनेनं बनवला त्या गोष्टीचा व्हिडीओ, नवऱ्याला पाठवला, नंतर जे झालं…
उत्तर प्रदेशात सासरा आणि सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका सासऱ्याने सुनेसोबत अश्लील चाळे केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अधिक तपास केला जात आहे.

सासरा आणि सुनेचं नातं हे बापलेकीचं नातं असतं. पण काही घाणेरड्या विचाराचे लोक नात्याला काळीमा फासत असतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे घडला आहे. एका सासऱ्याने तिच्या सुनेसोबत घाणेरडा प्रकार केला. ती एकटी असल्याची संधी साधून त्याने हे घाणेरडं कृत्य केलं. त्याला सुनेनं विरोध केला. पण तरीही तो सुधारला नाही. त्यामुळे वैतागलेल्या सुनेने अखेर सासऱ्याचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडीओ काढला आणि तो नवऱ्यलाच पाठवला.
वडिलांचं अश्लील कृत्य पाहून मुलगा चांगलाच संतापला. त्याने कामावर सुट्टी टाकली आणि थेट घरी आला. घरी आल्यावर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन वडिलांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील मक्खनपूर परिसरातील ही घटना आहे. या तरुणाचं गेल्या वर्षी म्हणजे 2024 रोजी लग्न झालं होतं. नोकरीनिमित्ताने तो दुसऱ्या राज्यात राहत होता. त्याची बायको त्याच्या आईवडिलांकडे राहत होती. पण मुलगा घरी नसल्याचं पाहून सासरा सुनेसोबतच अश्लील चाळे करू लागला. सुनेला छेडायचा आणि तिच्यावर जबरदस्ती करायचा. सुनेचे घरचे लोक त्याला समजवायला आले तर त्याने त्यांनाही मारहाण केली.
वडिलांच्या विरोधात एफआयआर
सासऱ्याच्या या अश्लील चाळ्यांचा सुनेने व्हिडीओ काढला. त्यानंतर तिने नवऱ्याला पाठवला. त्यामुळे मुलगा संतापला आणि तो तडक घराकडे आला आणि वडिलांच्या विरोधात पोलिसात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा गुजरातमध्ये नोकरी करतो. त्याचं लग्न करहल येथील एका तरुणीशी झालं होतं. एक वर्षापूर्वी हा विवाह झाला. खासगी नोकरी असल्याने मुलगा नेहमी बाहेरच असतो. तर बायकोला त्याने आईवडिलांची सेवा करण्यासाठी घरी सोडलं होतं.
व्हिडीओ बनवून पाठवला
मुलगा बाहेर राहत असल्याचं पाहून सासऱ्याने फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. मला पाहून तो सतत अश्लील हरकत करायचा. मी त्यांना अनेकदा समजावलं. पण त्यांचा स्वभाव काही बदलला नाही. उलट त्यांचे अश्लील चाळे अधिकच वाढले. नवऱ्याला मी थेट सांगू शकले असते. पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसला नसता. शिवाय माझं म्हणण्याचा चुकीचा अर्थही काढू शकले असते. त्यामुळे मी सासऱ्याचा चोरून व्हिडिओ काढला. माझ्या रुममध्ये येऊन सासरा माझ्याशी अश्लील चाळा करू लागला तेव्हा मी तो व्हिडीओ काढला. त्यानंतर मी नवऱ्याला व्हिडीओ पाठवला, असं या पीडित महिलेने सांगितलं. दरम्यान, आम्ही आरोपी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. महिलेचं मेडिकलही करण्यात आलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
