कर्तृत्वाने सांभाळला गावचा कारभार, पण सासुरवासाची ठरली शिकार; महिला सरपंचाची विष पिऊन आत्महत्या

मयत योगीता फापाळे यांचा भाऊ संतोष गवळी यांनी बहिणीच्या आत्महत्येला सासरच्यांना जबाबदार धरले आहे. आपली बहिण सरपंच झाल्यापासून तिला सतत सासरची मंडळी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन मानसिक व शारिरीक त्रास देत होती.

कर्तृत्वाने सांभाळला गावचा कारभार, पण सासुरवासाची ठरली शिकार; महिला सरपंचाची विष पिऊन आत्महत्या
आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 1:00 AM

लासलगाव : सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सासरच्यांकडून होत असलेला मानसिक व शारीरिक छळ आणि चारित्र्यावर संशय घेणे यामुळे कंटाळून एका महिला सरपंचाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना निफाड तालुक्याती मरळगोई गावात घडली आहे. योगीता अनिल फापाळे असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच पद ठरले छळवणुकीचे कारण

कन्नड तालुक्यातील मकरंदपूर गावातील योगीता फापाळे यांचा आठ वर्षापूर्वी 2013 मध्ये निफाड तालुक्यातील अनिल फापाळे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये देखील आहेत. योगीता फापाळे यांचा पती अनिल फापाळे हा शेतकरी आहे. तीन वर्षांपूर्वी 2018 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत योगीत फापाळे या निवडून आल्या होत्या. त्यांची मरळगोई खुर्द ग्रामपंचायतच्या सरपंच पदी निवड करण्यात आली होती. गेली तीन वर्षे त्या सरपंच पदाची जबाबदारी चोखपणे पार पाडत होत्या. मात्र हे सरपंद पदच त्यांच्या छळवणुकीला आणि मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे माहेरच्यांच्या तक्रारीवरुन कळते.

विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या

मयत योगीता फापाळे यांचा भाऊ संतोष गवळी यांनी बहिणीच्या आत्महत्येला सासरच्यांना जबाबदार धरले आहे. आपली बहिण सरपंच झाल्यापासून तिला सतत सासरची मंडळी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन मानसिक व शारिरीक त्रास देत होती. तसेच तिच्या चारित्र्यावरही सासरचे संशय घेत होते, असे संतोष गवळी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळूनच योगीता यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. योगीता यांनी मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. यानंतर तात्काळ पती अनिल फापाळे याने योगीता यांना लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी मयत योगीता फापाळे यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार सासरे बाबासाहेब फापाळे, पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासू सरला फापाळे आणि दिर प्रदिप फापाळे या चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात भादवी 306, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे करीत आहेत. (Female Sarpanch commits suicide due to domestic violence)

इतर बातम्या

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावीला अटक

चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने सूनेकडून सासऱ्याची कु्ऱ्हाडीने वार करुन हत्या

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.