परमबीर सिंगांनी टाळलं, चित्रपट निर्माते भरत शाहांचा नातू यश मेहतावर दीड वर्षांनी आरोपपत्र

परमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना यश मेहता यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याबाबत आरोपपत्र दाखल झालं नव्हतं (Bharat Shah Grandson Yash Mehta)

परमबीर सिंगांनी टाळलं, चित्रपट निर्माते भरत शाहांचा नातू यश मेहतावर दीड वर्षांनी आरोपपत्र
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 9:34 AM

मुंबई : चित्रपट निर्माते आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी भरत शाहा (Bharat Shah) यांच्या नातवाच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. यश मेहता (Yash Mehta) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबईच्या गावदेवी भागातील पब मध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत थांबल्याप्रकरणी अखेर दीड वर्षांनी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. तत्कालीन महासंचालक परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गावदेवीचे पोलीस निरीक्षक अनुप डांगे (Anup Dange) यांच्यावर दबाव आणत त्यावेळी कारवाई टाळली होती. (Film Producer Bharat Shah Grandson Yash Mehta Charge sheet in two years old case in Gaondevi Pub PI Anup Dange)

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी त्यावेळी कारवाई केली होती, मात्र ती टाळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) चे तत्कालीन महासंचालक परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी डांगे यांच्यावर दबाव आणल्याचा दावा केला जातो. हा दबाव झुगारून डांगे यांनी गुन्हा दाखल केला होता. याच त्वेषातून परमबीर सिंग यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर डांगे यांना निलंबित केल्याचं बोललं जातं.

परमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना यश मेहता यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याबाबत आरोपपत्र दाखल झालं नव्हतं. आता हे आरोपत्र दीड वर्षानंतर दाखल झालं आहे.

अनुप डांगे यांचे आरोप काय?

गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या अनुप डांगे यांनी काही काळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री यांना एक पत्र लिहून परमबीर सिंग यांच्यावर अंडरवर्ल्डशी मैत्री आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. अनुप डांगे यांच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये एका पबवर छापा टाकताना पबचे मालक जीतू निवलानी यांनी परमबीर सिंग यांच्याशी संबंध असल्याची धमकी दिली होती. (Bharat Shah Grandson Yash Mehta)

विरोधात पुरेसे पुरावे नसले तरी केस तयार केली म्हणून संबंधित व्यावसायिकाविरुद्ध खटला भरण्यासाठी विभागीय कार्यवाही करत असताना आपल्याला निलंबित करण्यात आले होते, असा दावा अनुप डांगे यांनी केला. अनुप डांगे यांच्या दाव्यानुसार त्यांना पब मालकाच्या सांगण्यावरुन परमबीर सिंग यांनीच अडकवलं होतं.

परमबीर यांच्या निकटवर्तीयाकडून दोन कोटींची मागणी

परमबीर सिंग हे अंडरवर्ल्डमधील काही गुंडांच्या सेटिंगचं काम पाहत असत. क्राईम ब्रांचमार्फत ते डील करत होते, असा आरोप अनुप डांगे यांनी केला होता. परमबीर सिंग यांच्या जवळच्या एका व्यक्तीने त्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करण्यासाठी 2 कोटींची मागणी केल्याचाही दावा डांगेंनी केला होता.

संबंधित बातम्या :

बुकी सोनू जालान ते पीआय डांगे, परमबीर सिंग यांच्यावरील तीन आरोपांची गोपनीय चौकशी

परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध? पोलीस निरीक्षक अनुप डांगेंच्या आरोपांचीही चौकशी होणार

(Bharat Shah Grandson Yash Mehta)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.