AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिडकीचे ग्रील कापले, पाण्याच्या टाकीवर गेल्या अन् शौचालयाच्या पाईपवरून उतरून पळाल्या; पनवेलमधून पाच मुलींनी असं केलं पलायन

पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल बालसुधारगृहातून पाच मुलींनी पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलींपैकी तिघा मुलींना शोधून काढले आहे.

खिडकीचे ग्रील कापले, पाण्याच्या टाकीवर गेल्या अन् शौचालयाच्या पाईपवरून उतरून पळाल्या; पनवेलमधून पाच मुलींनी असं केलं पलायन
panvel city police
| Updated on: Sep 30, 2025 | 6:07 PM
Share

पनवेलच्या बालसुधारगृहातून पाच मुली शौचालयाच्या पाईपवरुन उतरुन पळाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. या प्रकरणाने खळबळ उडाली होती. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा या प्रकरणात दाखल करण्यात आला.या मुलींना शोधण्यासाठी पनवेल शहर पोलिसांनी जंगजंग पछाडले. त्यानंतर नातेवाईक आणि इतर सूत्रांचा वापर करुन त्यातील तिघा मुलींना कसे तरी शोधून काढण्यात आले. त्यांनी या संदर्भात कबुली देताना पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे.

पनवेलमधील बालसुधारगृहातून पाच मुली पळून गेल्या असल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी १२ ते १७ वयोगटातील या मुलींचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यानंतर,पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे पोलिस आणि मुलींच्या नातेवाईकांच्या मदतीने काही तासांतच तीन मुलींना सुरक्षितपणे शोधून काढले. यावेळी मुलींनी धक्कादायक कारण सांगितले की त्यांना बालसुधारगृहात राहायचे नव्हते, म्हणूनच त्या स्वतः पळून गेल्या. तर अन्य दोन मुलींचा शोध सध्या सुरू आहे.

यावेळी पनवेल पोलिसांच्या इतर तपास यंत्रणांशी समन्वयामुळे शोध मोहीम यशस्वी झाली. पाचपैकी तीन मुली सापडल्या. त्यापैकी एक उरणमधील चिरनेर येथील तिच्या गावात सापडली. दुसरी मुलगी मुंबईतील वांद्रे येथील रेल्वे पोलिसांना सापडली. तिच्यासोबत कोणीही नसल्याने तिला डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तिसरी मुलगी सातारा जिल्ह्यातील तिच्या मूळ गावी पोहोचल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. सातारा पोलिसांनी या मुलीला जवळच्या बालसुधारगृहात ठेवण्याची कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या संदर्भात पोलिस इतर दोन मुलींचा शोध घेत आहेत.

मनाप्रमाणे रहाता येत नाही

बालसुधारगृहातून पळून गेलेल्या मुलींनी सांगितले की, पनवेलमधील मुलींच्या अनाथाश्रमाची एक मजली इमारत आहे. मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे अनाथाश्रमात राहण्याची परवानगी नव्हती, म्हणून त्यांनी पळून जाण्याचा कट रचला. त्यांनी सभागृहाच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल कापले, त्यानंतर त्या खिडकीबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढल्या. थोडे अंतर चालल्यानंतर, त्या शौचालयाच्या पाईपमधून जमिनीवरून खाली घसरत उतरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...